पुन्हा एकदा शिवसेनेचे अमोल आवळे यांच्याकडून माणुसकीचे दर्शन
स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक,दि.20 ( रणजित लेंभे) : मध्यप्रदेश या राज्यातील ३२ परप्रांतीय मजूर साताराहून आपल्या गावी पायी चालत चालले होते,वाठार स्टेशन येथे आल्यावर या मजूर लोकांना प्रशासनाच्या मदतीने जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था केल्या बद्दल पुन्हा एकदा शिवसेनेचे अमोल आवळे यांच्याकडून माणुसकीचे दर्शन दिसून आले आहे.
काल मंगळवार दि.१९ रोजी सकाळी अकराच्या सुमारास सातारा परिसरात मजूर म्हणून कामाला आलेले ३२ परप्रांतीय तब्बल दोन महिने लॉकडाऊनमुळे सातारा या ठिकाणी अडकले होते. काल ते साताराहून आपल्या राज्यात पायी निघाले होते. वाठार स्टेशनमध्ये आल्यानंतर कोरेगाव-फलटण तालुक्याचे शिवसेना क्षेत्रप्रमुख अमोल आवळे यांना यांबाबतची माहिती मिळाली.त्यांनी तातडीने हालचाल व माहिती घेऊन राज्याचे मुख्यमंत्री ऊद्धवजी ठाकरे यांनी परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी विशेष निधीची व्यवस्था केलेली आहे. पण याबाबतची माहिती नसलेले ३२ परप्रांतीय मजुर मध्यप्रदेश येथे जाण्यासाठी पायी निघाले होते ते जेव्हा वाठार स्टे.मधे पोहचले, याची माहिती समजली या नंतर त्यांनी याबाबत प्रांताधिकारी श्रीमती किर्ती नलवडे व वाठार पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचाकडुन सकारात्मक प्रतिसाद मिळाला व कोरेगाव महामंडळाच्या दोन बसेस त्या मजुरांना छिंदवाडा (मध्यप्रदेश ) येथे पोहचवण्यासाठी प्रशासनाकडुन उपलब्ध करुन मिळाल्या व त्या बसेस सर्व मजुरांना घेऊन मध्य प्रदेशच्या सिमेपर्यंत रवाना पण झाल्या याकामी प्रांताधिकारी किर्ती नलवडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील घोंगडे साहेब, करोना दक्षता समिती यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
जेव्हा हे मजुर बसमध्ये बसत होते, तेव्हा त्यांनी राज्याचे मख्यमंत्री व आम्हा सर्वांचे आभार मानत असताना त्यांच्या डोळ्यामधे आनंदाश्रु तरळले. याअगोदर दि. ६ मे रोजी ४२ परप्रांतीय लोकांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था अमोल आवळे यांनी केली होती, आत्ताही त्यांच्या तत्परता व प्रशासनाच्या जलद मदतीने ३२ परप्रांतीयांना आपल्या गावी जाता आले. या घटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.