
दैनिक स्थैर्य । 27 मार्च 2025। मुंबई। नादुरुस्त रोहित बसविण्यासाठी 30 ते 40 दिवसांचा कालावधी लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र नादुरुस्त रोहित्र 48 तासात बसविण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानसभेत नियम 293 अन्वये ठरावाला उत्तर देताना सांगितले.
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून राज्यात कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जेचा उपयोग करण्यात येत आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून 10 टक्के अनुदानावर कृषी पंप देण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या कुसुम आणि राज्याच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून 2015 ते 2023 पर्यंत 1 लाख 89 हजार 820 सौर कृषी पंप लावण्यात आले आहे.
राज्यात मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या लाभासाठी 12 लाख शेतकर्यांनी ऑनलाईन अर्ज केले करण्यात आले आहे. आतापर्यंत सौर कृषी पंप योजनेतून 4 लाख 69 हजार 442 कृषी पंप लावण्यात आले आहे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून 45 लाख कृषी पंपधारक शेतकर्यांचे वीज देयक झिरो करण्यात येत आहे. राज्यातील वीज दर कमी करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगात वीज दर याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यात पुढील एक वर्षात 10 हजार मेगावॉट सौर विजेचे उत्पादन करण्यात येणार आहे.
या सर्व प्रयत्नामुळे पहिल्यांदा औद्योगिक विजेचे दर कमी होणार आहे, असेही राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.