• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

सेना- भाजपचे निष्ठावंत सरकारच्या कार्यपद्धती गतिमान करण्याच्या प्रतीक्षेत

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
मार्च 16, 2023
in सातारा जिल्हा
मराठा, धनगर समाज आरक्षण,,, जुनी पेन्शन,, कांद्याची घसरलेले दर,,,गॅस सिलेंडरचे वाढते दर,,,बेरोजगारी व देशातील सरकारी उधोग भांडवलदारांच्या खिश्यात घालण्याचा

मराठा, धनगर समाज आरक्षण,,, जुनी पेन्शन,, कांद्याची घसरलेले दर,,,गॅस सिलेंडरचे वाढते दर,,,बेरोजगारी व देशातील सरकारी उधोग भांडवलदारांच्या खिश्यात घालण्याचा


दैनिक स्थैर्य । दि. १६ मार्च २०२२ । सातारा । सध्या भारतीय जनता पार्टीने भिलार ता. महाबळेश्वर येथील अभ्यास वर्गात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचाच कार्यकर्ता असेल असा प्रचार सुरू केला आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा- जावली, माण- खटाव ,कोरेगाव या मतदारसंघात सेना भाजपचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते सत्ताधाऱ्यांच्या कार्यप्रणाली गतिमान करण्याच्या प्रतीक्षेत आहे.मात्र,भाजप पक्षांतर्गत घडामोडीवर स्पष्ट बोलणे टाळले आहे.

 

याबाबत माहिती अशी की ,व्यक्तीनिष्ठा जपून आपला नेता ज्या पक्षात तोच आपला पक्ष असे समजून  सेना-भाजप पक्षामध्ये काहींनी प्रवेश केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाजप पक्ष हा महाराष्ट्रातील एक नंबरचा पक्ष अशी वल्गना सुरू झालेली आहे. मुळात सातारा जिल्ह्यात व्यक्ती पूजक कार्यकर्त्यांची संख्या वाढली असून निष्ठा, तत्त्व ,वैचारिक भूमिका याच्याशी देणेघेणे राहिलेले नाही.”’ आमचा नेता, आमचा पक्ष ”असा नारा देऊन ”सबका साथ,, सबका विकास’ या ब्रीद वाक्याला श्रद्धांजली वाहिली आहे.असे सरास चित्र दिसत आहे.भाजप मधीलच आमदार-खासदारांचे मतभेदाची दळणे दररोज दळली जात आहेत.

भविष्यात अशा या विनानिष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे लवकरच सेना- भाजप उघडी पडेल. त्यावेळेला त्यांना निष्ठावंत कार्यकर्त्यांची गरज भासेल. अशी आता कार्यकर्ता भूमिका मांडू लागला आहे. त्याकडे दुर्लक्ष होऊ नये ही माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिवसेना असो की,एकेकाळी भाजपचा ध्वज अथवा राष्ट्रीय स्वयं संघाचे नाव घेतली तरी आग पाखड करणाऱ्या काही राजकीय कुटुंबातील सदस्य आता शहा-मोदींचे कौतुक करण्यास धन्यता मानत आहे. या पाठीमागे कोणतीही राजकीय भूमिका नसून आपला  किती स्वार्थ जास्त होतो? याकडेच बारकाईने लक्ष देऊन आहेत.

छोट्या- छोट्या जातींची महामंडळ करून छोट्या जातींना खुश करण्याचा प्रयत्न होत आहे.  यामुळे त्या जातीतील काही सदस्य आता शहा-मोदींचे कौतुक करण्यास धन्यता मानत आहे..सेना- भाजपमध्ये आलेले सर्वच नेते हे प्रामाणिक किंवा अप्रामाणिक नाहीत तर त्यामधील काही नेत्यांवर इतर पक्षांमध्ये खरोखर अन्याय झालेला आहे. या अन्यायाची चीड म्हणून एक पर्याय म्हणून काहीनी सेना- भाजप पक्षात प्रवेशकर्ती बनले आहेत.

सेना- भाजप पक्षांनीही विकासाच्या दृष्टीने विकास कामे भरपूर केली आहेत. या गोष्टी सुध्दा नजरेआड करून चालणार नाहीत .छोट्या- छोट्या जातींची महामंडळ करून छोट्या जातींना खुश करण्याचा प्रयत्न होत आहे. या महामंडळाच्या माध्यमातून ५० ते १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. या महामंडळाची चालू अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर अनेकांनी सत्ताधाऱ्यांचे सत्कार व स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिलेले आहेत.

बऱ्याच लोकांना आता महामंडळावर वर्णी लागेल. अशी अशा पल्लवी झाल्यामुळे सत्कार करणाऱ्यांची संख्या वाढू लागलेली आहे. हे त्रिवार सत्य आहे. टोपल्यात भाकरी चार आणि खाणारे नऊ असल्यानंतर पाच व्यक्ती नाराज होतात किंवा त्यांना अर्धपोटी राहावे लागते. असाच काहीसा प्रकार नवीन महामंडळाबाबत होऊ नये. याची सत्ताधाऱ्यांनी दक्षता घ्यावी. अशी मागणी पुढे आलेले आहे.

भारतीय जनता पक्ष हा खरं म्हणजे राष्ट्रीय स्वयं संघाच्या व जनता पार्टीच्या पायाभरणीतून उभा राहिलेला पक्ष आहे. संघाचे कार्यकर्ते अथवा भाजपचे कार्यकर्ते हे भाजप व्यतिरिक्त कुणालाही मत देणार नाही. कारण, त्यांची बांधिलकी ही भाजपसोबत आहे.अशीच एकेकाळी शिवसेनेची अवस्था होती. परंतु, अलीकडच्या काळात इतर पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांची सेटलमेंट अथवा तडजोड पाहिली तर निष्ठावंत सेना- भाजप कार्यकर्त्यांना आता या पक्षाचा एकतर्फी कारभारामुळे त्रास सहन करावा लागत आहे अशी चर्चा होताना दिसते. ही चर्चा दुर्लक्षित करण्यासारखी नाही. असे भाजपचे वरिष्ठ नेते मानत आहे.

राजकारण करत असताना काही उणिवा असल्या तरी सुद्धा कार्यकर्त्यांना सामावून घेण्यामध्ये राजकीय हित आहे. वैचारिक भूमिका सेना- भाजप कधीही बदलणार नाही. त्यामुळे सेना- भाजपच्या नाराज असणाऱ्या कार्यकर्त्यांची लवकरच समजूत काढण्यात यश मिळेल. असे काही पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याची अटीवर सांगितले.

शिवसेनेचे विभाजन झाले.त्यानंतर शिवसेनेचे मावळे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजप वरिष्ठ नेत्यांनी वर्णी लावून ठाकरे कुटुंबातील सदस्य यांच्या सह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलेच डिवचले आहे. त्यातच शिवसेनेत मानापमान नाट्याने दुखावलेले व व्यवसायिक राजकर्त्यांनी शिवसेनेच्या एका गटात प्रवेश करण्याचा सपाटा लावला आहे. या प्रक्रियेत सेना- भाजप निष्ठावंत मंडळी नाराज झाली आहेत.त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष लक्ष वेधले पाहिजे अन्यथा भाजप -सेनेला उमेदवार मिळतील पण, निष्ठावंत कार्यकर्ते मिळणार नाही. अशी ही भीती व्यक्त होत आहे.दरम्यान, भाजप निष्ठावंत कार्यकर्ते मंदार जोशी,सहकार भारतीचे विनय भिसे यांच्या सह डझनभर जुन्या व निष्ठावंत भाजप कार्यकर्ते यांनी भाजपची सत्ता पूर्ण यावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे नमूद केले आहे.मात्र, अधिक भाष्य करणे टाळले आहे. शिवसेनेचे शिवसैनिक रमेश बोराटे, आतिष ननावरे, युवराज पाटील, महेश शिंदे, हर्षल कदम आदि मान्यवरांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.


Previous Post

सातारच्या चंद्रविलास हॉटेलचे डिंकलाडू निघाले मदीनाला

Next Post

विधानभवनाच्या प्रांगणात ‘शतायु मुकेश’ कार्यक्रमातून गायक मुकेश यांना आदरांजली

Next Post

विधानभवनाच्या प्रांगणात ‘शतायु मुकेश’ कार्यक्रमातून गायक मुकेश यांना आदरांजली

ताज्या बातम्या

वडूज ता. खटाव येथील रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीतील कार्यकर्ते

रिपब्लिकन पक्षाच्या सन्मानासाठी खटाव शेती बाजार समितीच्या रिंगणात – गणेश भोसले

मार्च 30, 2023

मातृभाषेसाठी एकत्र येऊन काम करू – उद्धव ठाकरे

मार्च 30, 2023

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा

मार्च 30, 2023

तर डॉक्टरांवर बुट पॉलिश अन् भाजी विकण्याची वेळ; विधेयकाविरुद्ध डॉक्टर रस्त्यावर

मार्च 30, 2023

“पुण्याची ताकद गिरीश बापट”, हजारोंच्या समुदायात गिरीश बापट यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मार्च 30, 2023

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने प्रियदर्शनी राजा सम्राट अशोक यांचा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न

मार्च 30, 2023

राज्यात सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत अत्याधुनिक महासंग्रहालय उभे केले जाईल – मुनगंटीवार

मार्च 30, 2023

कोळकीच्या नागरिकाची रस्ता डांबरीकरणासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन तक्रार; ग्रामविकास अधिकार्‍यास धरले धार्‍यावर

मार्च 30, 2023

गोखळी येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा

मार्च 30, 2023

घरकुल योजनेत भ्रष्टाचार; ५ हजार रुपये घेऊन होतेय लाभार्थ्याची निवड; ग्रामसेवकासह ग्रामपंचायत पदाधिकारी खात आहेत कमिशन

मार्च 30, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!