दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२३ । मुंबई । जिल्ह्यात कोणताही अनुचीत प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 2014 चे कलम 37 (1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार 19 ऑगस्ट 2023 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.