कोविड मदत कक्ष ग्रुप वाखरीच्या कामाचे कौतुक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि. 13 : सध्या लॉकडाऊनमुळे सर्वजण घरीच असल्याने अशा वेळी हातावर पोट असणार्‍या व शेतमजूर गरजू कुठुंबांना रोजगार नसलेने हे लोक अडचणीत आहेत. अशावेळी मदतीसाठी जीवनावश्यक वस्तूंचे 81 किराणा कीटचे वाटप करण्याचा वाखरी येथील कोविड मदत कक्षा तर्फे निर्णय झाला आणि तो लगेच अंमलात आला. वाखरीतील कोणत्याही गरजू कुठुंबांने ग्रुपमधील सदस्याला फोन करून आवश्यक त्या वस्तूची गरज कळवली की लगेच ग्रुप मधील सदस्याने त्याला घरपोच किराणा किट चे वितरण केले, या कार्याबद्दल कोविड मदत कक्ष गु्रप वाखरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

याबाबत बोलताना या ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले की, ‘‘कोविड मदत कक्ष वाखरी यांचा ‘एक हात मदतीचा’ त्या लोकांपर्यंत पोहोचला ज्यांना त्याची गरज आहे. ग्रुपमधील सर्व सभासदांनी यामध्ये सहभाग घेतला. आजपर्यंत जयेश ढेकळे यांनी 2000 मास्क व सॅनिटाइजर च्या बॉटल्स, कृष्णात कुंभार गुरुजींनी वाढदिवसानिमित्त 11 कुठुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे कीटचे वाटप व शरद ढेकळे यांचे कडून 500 मास्क व 15 लिटर सॅनिटाइजर फ्रंट वर काम करणार्‍या आशा ताई व अंगणवाडी ताई यांना वाटप करण्यात आले. ग्रुपमधील सदस्यांनी एका संकटकाळी देणगी स्वरूपात केलेली मदत नक्कीच सार्थकी लागली आहे. गरजू बांधवांच्या चेहर्‍यावरील आनंदाचे आणि कृतज्ञतेचे भाव पाहून खरोखरच कामाचे चीझ झाल्याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. आम्हाला याहीपेक्षा मोठे काम करायचे आहे.’’

वाखरी येथील हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कृष्णात कुंभार, तुकाराम सुतार, भानुदास ढेकळे, दत्तात्रय ढेकळे, मेहनत घेत आहेत.


Back to top button
Don`t copy text!