ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशनच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी विवेक गायकवाड यांची नियुक्ती


दैनिक स्थैर्य | दि. १८ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी श्री. विवेक दशरथ गायकवाड यांची नियुक्ती केली आहे.

ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य या संघटनेचा पुणे येथे झालेला कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पार पडला. कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून दिग्गज मान्यवर उपस्थित होते. त्यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील उपसमित्या नेमण्यात आल्या. त्यामध्ये सातारा जिल्हाध्यक्षपदी श्री. विवेक गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे.

या नियुतीबद्दल बोलताना श्री. विवेक गायकवाड यांनी सांगितले की, मला सातारा जिल्हाध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. माझ्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन. सातारा जिल्ह्यातील सर्व ऑडीटर्स बंधू-भगिनींचे मला सहकार्य नक्कीच लाभेल, अशी आशा आहे.

या निवडीबद्दल ऑडीटर्स कौन्सिल अ‍ॅण्ड वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य संघटनेने म्हटले आहे की, श्री. विवेक दशरथ गायकवाड, सहकारी लेखापरीक्षण व त्याअनुषंगाने ऑडीटर्स कौन्सिल अ‍ॅण्ड वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून प्रमाणित लेखापरीक्षकांसाठी आपण करीत असलेल्या कार्यास अनुसरून आपली असोसिएशनच्या सातारा जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आपण आपल्या कार्यातून नक्कीच या जबाबदारीला न्याय द्याल, अशी अपेक्षा आहे. आपल्या नियुक्तीबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास मन:पूर्वक शुभेच्छा!


Back to top button
Don`t copy text!