
स्थैर्य, सातारा, दि.७: करंजे (ता. सातारा) येथील महानुभव आश्रमाच्या महंतपदी दि. २२/१०/२०२० रोजी राजधरदादा बीडकर यांची नियुक्ती करण्यात आली.
राजधरदादा बीडकर यांचा जन्म बिदाल (ता. माण) येथे झाला. आश्रमाचे भूतपूर्व संचालक उपाध्य कुलाचार्य वर्धनस्थ बीडकर यांना निमित्त करुन सन्यास आश्रमात प्रवेश केला होता. श्री ब्रह्मविद्या अध्ययन संवत्सर विद्यापीठाचे कुलगुरु कै. राजधरबाबा यांच्या सानिध्यात पूर्ण केले. राजधरदादा यांनी 17 वर्षांचा अध्ययनाचा अनुभव सोबत घेवून पुढील 15 वर्षे विद्यादानाचे काम केले आहे.
दरम्यान, या नियुक्तीनंतर राजधरदादा बीडकर यांचे भारतात व संपूर्ण जगभरात पसरलेल्या महानुभव पंथीयांच्या अनुयायांत समाधानाचे वातावरण आहे. यानंतर ते महंत श्री सातारकर बाबा महानुभाव या नावाने ओळखले जातील.