
दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२२ । मुंबई । पालघर आणि सांगली जिल्ह्यांसाठी पालक सचिव पदांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्याच्या पालक सचिवपदी सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास आणि पालघर जिल्ह्याच्या पालक सचिवपदी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.