सातारा जिल्ह्यातील धरणांकरिता पूरनियंत्रक अधिकाऱ्यांच्या नेमणुका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 10 : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानंतर वाई, सातारा,  कराड-पाटण या तालुक्यातील गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तसेच लोकांना वेळोवेळी योग्य माहिती आणि तत्परतेने मदत मिळण्यासाठी म्हणून सातारा जिल्ह्यातील धरणांसाठी विविध पुरनियंत्रक अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे. काल (मंगळवार) जिल्हा सिंचन मंडळाचे अभियंता अधिक्षक यांनी या नेमणुका जाहीर केल्या आहेत.

धरणाचे नाव आणि पुरनियंत्रक अधिकाऱ्याचे नाव पुढीलप्रमाणे.

● कोयना धरण आणि कोळकेवाडी धरण – श्री. के. एच. पाटील, कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग, कोयना नगर. दुरध्वनी (०२३७२) २८४३४३. मो. क्र. ९८६०७६८७३८

● धोम धरण – श्री. व्ही. बी. अलटकर, उप विभागीय अधिकारी, धोम पाटबंधारे उपविभाग क्र.१, वाई. मो. क्र ९०४९६८११५७

● धोम बलकवडी धरण – श्री. एन. टी. पोतदार (अतिरिक्त कार्यभार ), सहाय्यक कार्यकारी अभियंता, धोम बलकवडी सिंचन उपविभाग क्र १, वाई. मो. क्र. ७५८८६१९९२०

● कण्हेर धरण – श्री. व्ही. टी. मोटे, सहाय्यक अभियंता श्रेणी १, कण्हेर पाटबंधारे उपविभाग क्र.१, सातारा. मो. क्र. ९४२००५०८००

● उरमोडी – श्री. आर. बी. घाडगे. उप विभागीय अधिकारी, उरमोडी सिंचन व्यवस्थापन उप विभाग, सातारा. मो. क्र. ८८०५३८७०७०

● येरळवाडी धरण – श्री. व्ही. एम. बनसोडे, उप विभागीय अभियंता, वडूज मध्यम प्रकल्प उप विभाग क्र.९, वडुज. मो. क्र. ७५८८३८३१९०

● नेर, राणंद, आंधळी धरण – श्री. एस. एम. खाडे, सहायक अभियंता श्रेणी-2 सातारा पाटबंधारे उपविभाग, दहिवाडी-गोंदवले. मो. क्र. ९४२३६६९०९५

पूरनियंत्रक अधिकाऱ्यांवरती पुढील जबाबदारी राहणार आहे.

● धरण क्षेत्रात नियंत्रण कक्ष स्थापन करणे व प्रशासनास माहितीची देवाण घेवाण करणे.

● धरण क्षेत्रात झालेला पाऊस, झालेला पाणीसाठा, पाणी पातळी इत्यादींची माहिती दररोज दि. ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत सातारा जिल्हा प्रशासनास कळविणे.

● पूर परिस्थितीमध्ये जनतेला / प्रसिध्दी माध्यमांना पूर परिस्थितीची अधिकृत माहिती देणे. तसेच ई-जलसेवा प्रणालीमध्ये माहिती अद्ययावत करणे.

● धरणाच्या आराखड्याप्रमाणे व पुरपरिस्थितीची माहिती घेवून धरणाची व लोकवस्तीच्या सुरक्षिततेची काळजी घेत पाणी सोडणे.

● धरणातून पावसाळ्यात प्रथम पाणी सोडण्यापुर्वी तसेच धरण भरत आले असताना मंत्रालयातील पूर नियंत्रक कक्ष, जलसंपदा, महसूल, गृह खात्याचे संबंधीत अधिकारी यांना पूर्व सूचना देणे.

पूर नियंत्रण कक्षाची स्थापना

पावसाळ्यात येणाऱ्या पूर परिस्थिती व अशा प्रकारच्या सर्व नैसर्गीक आपत्तीस समर्थपणे तोंड देण्यासाठी तसेच शासन, अधीक्षक अभियंता, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस विभाग यांना अधिकृत माहिती देण्यासाठी  कार्यकारी अभियंता कृष्णा सिंचन विभागात पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!