भाजपा प्रदेश सरचिटणीसपदी पाच नेत्यांची नियुक्ती


दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२२ । मुंबई । भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश सरचिटणीसपदी पाच नेत्यांची आज नियुक्ती केली, अशी माहिती प्रदेश मुख्य प्रवक्ते मा. केशव उपाध्ये यांनी गुरुवारी दिली.

मा. केशव उपाध्ये म्हणाले की, मा. प्रदेशाध्यक्षांनी मा. ॲड. माधवी नाईक (ठाणे), मा. विक्रांत पाटील (रायगड), मा. रणधीर सावरकर (अकोला), मा. संजय केणेकर (संभाजीनगर) व मा. मुरलीधर मोहोळ (पुणे) यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली. ही नियुक्ती तत्काळ लागू झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!