दैनिक स्थैर्य | दि. १४ जून २०२४ | फलटण |
फलटण नगर परिषद सभागृहात गुरुवारी मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या हस्ते सौ. मीनल ताराचंद गलियल यांच्या जागी त्यांचा मुलगा प्रवीण ताराचंद गलियल यास आरोग्य विभाग सफाई कामगार म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आली. ही नियुक्ती आरोग्य विभाग सफाई कामगार लाड पागे शिफारशीनुसार देण्यात आली आहे.
यावेळी सफाई कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक मारुडा यांनी मुख्याधिकारी निखिल मोरे यांचा श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मुख्याधिकारी मोरे यांनी सफाई कर्मचार्यांचे प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले. तसेच आस्थापनाच्या साधना पवार यांनी चांगल्या पद्धतीने काम केल्याबद्दल सफाई कर्मचार्यांचा सत्कार केला.
प्रवीण गलियल यास सफाई कर्मचार्याचे नियुक्तीपत्र दिल्याने मुख्याधिकारी यांचे यावेळी अभिनंदन करून आभार मानण्यात आले. तसेच १९९१ ते १९९५ मध्ये सफाई कर्मचार्यांच्या वारसांना वारस हक्क विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व कै. खा. हिंदूराव नाईक निंबाळकर व माजी आमदार कै. हरिभाऊ नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे मिळाला आहे. त्याबद्दल त्यांचे सफाई कर्मचारी ऋणी आहेत, असे संघटनेचे राजू मारुडा यांनी यावेळी म्हटले.
यावेळी फलटण नगर परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील, कार्यालय अधीक्षक मुस्ताक महात, लिपिक विजय मारुडा, राकेश गलियल, स्वच्छता निरीक्षक, पी. के. तुळशे, ढेंबरे, नितीन वाळा, मुकेश अहिवळे, साळुंके, संतोष घाडगे, नयना वाळा, शिंदे, शिरतोडे, खामगळ, संघटनेचे फलटण शहराध्यक्ष मनोज मारुडा, उपाध्यक्ष रमेश वाघेला, आनंद डांगे जिल्हाध्यक्ष, युवा प्रकोष्ठा लखन डांगे, महामंत्री सारंग गलियल, सहखजिनदार अनिल डांगे, विनोद मारुडा, सूरज मारुडा, चंदूभाई मारुडा, बबलू डांगे, अजय मारुडा, रोहित मारुडा, सौ. मिनल गलियल, सौ. दीपमाला वाघेला, सौ. शितल वाळा, कल्पना वाळा, फलटण नगर परिषदेचे अधिकारी, संघटनेचे पदाधिकारी व सफाई कर्मचारी उपस्थित होते.