दैनिक स्थैर्य । दि. १४ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । आपले वरिष्ठ नेतृत्व अधिक प्रबळ करत फिनटे कंपनी एंजल वन लिमिटेडने प्रतीक मेहता यांची मुख्य व्यवसाय अधिकारी (चीफ बिझनेस ऑफिसर) म्हणून नियुक्ती केली आहे. आपल्या नवीन पदभारासह ते कंपनीसाठी दृष्टिकोन साध्य करण्याकरिता विकास धोरणे व व्यवसाय योजना आखतील.
प्रतीक यांना स्टार्टअप्स व फॉर्च्यून ५० कंपन्यांची निर्मिती आणि मूल्य निर्माण करण्यासाठी १९ वर्षांहून अधिक काळाचा विलक्षण अनुभव आहे, ज्यापैकी त्यांनी टाटा डिजिटल, स्क्रिपबॉक्स/अपवर्डली, मिंत्रा आणि झोवी सारख्या रिटेल व इंटरनेट व्यवसायांचे निराकरण करण्यामध्ये, तसेच त्यांचा विस्तार करण्यामध्ये १० वर्षाहून अधिक काळ कार्य केले आहे. विकास, उत्पादन, मार्केटिंग आणि ब्रॅण्ड या क्षेत्रातील त्यांचा अनुभव एंजल वनला अत्यंत लाभदायी ठरेल.
एंजल वन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर म्हणाले, ‘’आम्हाला आमचे मुख्य व्यवसाय अधिकारी म्हणून प्रतीक मेहता यांची नियुक्ती करण्याचा आनंद होत आहे. त्यांना धोरणात्मकरित्या डिजिटल व्यवसाय वाढवण्याचा जवळपास दोन दशकांचा संपन्न व वैविध्यपूर्ण अनुभव आहे. उत्साह व आशेसह मी त्यांचे एंजन वन कुटुंबामध्ये स्वागत करतो.’’
एंजल वन लिमिटेड येथील मुख्य व्यवसाय अधिकारी श्री. प्रतीक मेहता म्हणाले, ‘’एंजल वनचा व्यवसायाप्रती अद्वितीय व प्रभावी दृष्टिकोन आहे. कंपनीने आपल्या तंत्रज्ञानाचे पाठबळ असलेल्या डिजिटल-केंद्रित दृष्टिकोनासह गतकाळात उत्तम प्रगती केली आहे. मी या नवीन पदाभारासाठी आणि एंजलच्या भावी विकासामध्ये लक्षणीयरित्या योगदान देण्यासाठी उत्सुक आहे.’’
उद्योजक असण्याव्यतिरिक्त प्रतीक हौशी मॅरेथॉनर आणि एंजल गुंतवणूकदार देखील आहेत. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबादचे माजी विद्यार्थी आहेत.
टाटा डिजिटलमध्ये प्रतीक यांनी निओबँकिंग व गुंतवणूक व्यवसायाचे नेतृत्व केले आणि गुंतवणूक व बचत केंद्रित निओबँक तयार करण्यासाठी जबाबदार होते. त्यांनी अव्वल पाच वेल्थ टेक कंपन्यांपैकी एक अपवर्डलीची संकल्पना मांडण्यासोबत विस्तार केला, जी कालांतराने स्क्रिपबॉक्सने संपादित केले, जेथे सह-संस्थापक व चीफ बिझनेस ऑफिसर म्हणून ते ग्राहक अनुभव, उत्पादन व विपणन, विकास आणि नफा-तोटा यासाठी जबाबदार होते. मिंत्रामध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कंपनीच्या मल्टीब्रॅण्ड रिटेल व्यवसायाचे नेतृत्व केले आणि डेलमध्ये त्यांनी बी२बी विक्रीसाठी व्यवसाय धोरण तयार केले.