
दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२२ । सातारा । जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद सातारा यांच्यामार्फत सेवा पंधरवड्यात जास्तीत जास्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांना दिलेल्या आहेत.
तरी सेवा पंधरवड्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जातीच्या दाखल्याचा प्रस्ताव संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आवाहनही श्री. उबाळे यांनी केले आहे.