दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२२ । सातारा । जिल्हा परिषद सेस सन 2022-23 अंतर्गत अल्प, अत्यल्प भुधारक शेतकरी, महिला शेतकरी, दिव्यांग शेतकरी, मागासवर्गीय शेतकरी व इतर शेतऱ्यांनी आयुधे व अनसूचित जातीमधील शेतकऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गोरख शेलार यांनी केले आहे.
आयुधे औजरांसाठी अर्जासोबत 7/12, आधार कार्ड, रेशनिग कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स (मागासवर्गीय जातीचा, दिव्यांगाचा दाखला), आयडी साईज 1 फोटो याप्रमाणे परिपूर्ण अर्ज पंचाय समितीच्या कृषी विभागात 30 जुलै 2022 पर्यंत सादर करावा. विहित पद्धतीने खरेदी पश्चात 50 टक्के अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत अनु.जातीमधील शेतकऱ्यांनी 7/12, जातीचा दाखला 1.50 लक्ष आतिल उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बँक पासबुक, रेशनिंग कार्डची झेरॉक्स प्रत, लाभार्थी निवडीचा ग्रामसभा ठराव आयडेंटी फोटो व विहित नमुन्यातील अर्ज कृषी अधिकारी एस.टी. काठे यांच्याकडे सादर करावा. अधिक माहितीसाठी पंचायत समिती, पाटण कार्यालयाशी संपर्क साधावा.