स्थैर्य, सातारा, दि. 17 (विजय मांडके) : महाराष्ट्राचे लोककलावंत, परिवर्तनाच्या चळवळीचे शिलेदार स्मृतिशेष वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबावर कोरोनाच्या काळात आर्थिक मदत मागण्याची वेळ आल्याचे समजले आहे. आयुष्यभर पुरोगामी, परिवर्तनवादी आणि आंबेडकरी विचारांचा प्रसार करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या वामनदादांच्या वारसदारांना अशी वेळ येणे विचार करायला लावणारे आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रचे उपाध्यक्ष प्रा. गौतम काटकर यांनी वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबाला विद्रोहीच्या वतीने आर्थिक मदत करण्याचा प्रस्ताव राज्य कार्यकारणीच्या ग्रुपवर मांडल्यावर सामाजिक जबाबदारी म्हणून त्वरित मदतनिधी गोळा करावा असे ठरवले त्यानंतर कॉ. धनाजी गुरव यांनी कुटुंबातील सदस्यांशी फोनवर विचारपूस केल्यानंतर आणि सद्यपरिस्थिती जाणून घेतल्यानंतर मदतनिधी गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रच्या वतीने अनेक कलावंत, कार्यकर्ते यांना वेळोवेळी मदतीची उभारणी करून सहकार्याचा हात दिलेला आहे. प्रसिद्ध तमाशा कलावंत काळू बाळू कौलापूरकर तसेच शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला नाटकातील कलाकारांच्या गाडीच्या झालेल्या अपघातानंतर केलेली मदत ही दोन उदाहरणे आपणा सर्वांनाच माहिती आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांचेच आर्थिक नियोजन बिघडले आहे परंतु अशाही परिस्थितीत आपल्याला शक्य असेल इतकी मदत करावी ही विनंती. 30 जून 2020 पर्यंत आपल्या सर्वांची मदत एकत्रित करून त्यानंतर नाशिक येथे आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष कुटुंबातील सदस्यांना देण्याचे नियोजन आहे.
कृपया आपली आर्थिक मदत खालील बँक खात्यात जमा करावी अशी विनंती.
Samyak Vidrohi Prabodhan Sanstha
Bank Of India
Account No: 090010210000053
IFSC: BKID0000900
Branch: Kolhapur Main
MICR Code416013002
आपल्या सर्वांच्या छोट्याशा मदतीमधून मोठी रक्कम जमा होईल याची खात्री आहे.. कृपया आपले सहकारी आणि मित्रमंडळीनाही आपण हा मेसेज फॉरवर्ड करावा.