दैनिक स्थैर्य । दि.२४ जानेवारी २०२२ । सातारा । यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना व धनगर समाजासाठी घरकुल योजनांचे प्रस्ताव नागरिकांनी पंचायत समितीमार्फत सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना व धनगर समाजासाठी घरकुल योजनेचे सन 2021-22 मध्ये दोन्ही घरकुलांकरिता यापूर्वी पंचायत समितीनिहाय प्राप्त झालेले एकूण 152 प्रस्ताव मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. ग्रामसभेच्या ठरावानंतर पंचायत समिती स्तरावरील छाननीअंती यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना तसेच धनगर समाजासाठी घरकुल योजनेचे मंजूर व पात्र ठरलेले प्रस्ताव जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती स्तरावरील छाननीअंती यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना तसेच धनगर समाजासाठी घरकुल योजनेचे मंजूर व पात्र ठरलेले प्रस्ताव जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण, सातारा यांच्याकडे पुढील कार्यवाही साठी सादर करावे, असे जिल्हाधिकारी यांनी सूचित केले असल्याचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी कळविले आहे.