दैनिक स्थैर्य | दि. ०१ नोव्हेंबर २०२४ | सातारा | जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत सर्व निवडणूक निरीक्षक आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली. यावेळी रोकड वाटप अथवा अन्य प्रलोभने अथवा, अन्य गैर प्रकार आढळल्यास सिव्हीजील ॲप, जिल्हा प्रशासन, निवडणूक निरीक्षक यांच्या निदर्शनास आणून द्यावे.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शी आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांना सहकार्य करावे.आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या निवडणूक निरीक्षकांची नावे आणि संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे.
255- फलटण व 256- वाई विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक निरीक्षक नुह पी बवा संपर्क क्र. 9403327998/ 8766740545, निवडणूक निरीक्षक खर्च अरुण कुमार यादव संपर्क क्र. 9422658175,
257 – कोरेगाव व 258- माण विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक निरीक्षक भास्कर लक्षकर संपर्क क्र. 8275347388, निवडणूक निरीक्षक खर्च अरुण कुमार यादव संपर्क क्र. 9422658175,
259- कराड उत्तर व 260 कराड दक्षिण- विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक निरीक्षक गिथा ए संपर्क क्र.8149223632, निवडणूक निरीक्षक खर्च पी सैंथील संपर्क क्र. 9438917629.
261- पाटण व 262-सातारा विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक निरीक्षक वंदना वैदय संपर्क क्र.9403786971, निवडणूक निरीक्षक खर्च पी सैंथील संपर्क क्र. 940347244.
जिल्ह्यातील आठही मतदार संघासाठी निवडणूक पोलीस निरीक्षक पवन कुमार संपर्क क्र. 9423184175 यांचा आहे.