स्थैर्य, सातारा, दि. 18 : सोशल डिस्टंन्सिंग महत्त्वाचे असल्यामुळे सर्व कार्डधारकांना कोरोना बचाव नियम पाळण्याबाबत मिलीटरी कॅन्टीनतर्फे काही सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कॅन्टीनला एका कार्डवर एकच व्यक्ती येणे, 60 वर्षावरील वृद्ध लोकांनी येवू नये, त्यांनी त्यांचे प्रतिनिधी ओळखपत्र, मद्य परवाना व कार्ड घेवून पाठवावे. चारचाकी गाडी आणणे टाळावे, अशक्य असल्यास मुख्य रस्त्यावर दक्षिण बाजूस गाड्या लावाव्यात, शेजारील कॉलनीमध्ये किंवा उत्तरेस गाड्या लावल्यास कार्ड जप्त केले जाईल व पोलीस कार्यवाही होईल, दुचाकी फक्त एका व्यक्तीने कॅन्टीन पार्किंगमध्ये आणावी. कंटेन्मेंट झोनमधून येवू नये, सापडल्यास कार्ड जप्त व पोलीस कार्यवाही होईल. मे महिन्यात सोमवार व मंगळवार कॅन्टीन पूर्ण दिवस सुरू राहील. सकाळी 7.30 अगोदर कोणीही कॅन्टीनमध्ये येवू नये. सकाळी 9 वाजता ग्रोसरी विक्री सुरू होईल. मद्य विक्री सकाळी 10 वाजता सुरू होईल.
खाली दिलेल्या वेळ व तारखेनुसार त्या त्या तालुक्यातील कार्डधारकांनी यावे
दि. 19 ते 21 या तारखेस सकाळी 9 ते दुपारी 12.30 व दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत जावली, महाबळेश्वर, खंडाळा व सातारा.
दि. 22 ते 25 या तारखेस सकाळी 9 ते दुपारी 12.30 व दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत खटाव, माण, पाटण, फलटण, वाई, कोरेगाव.
26 ते 29 या तारखेस सकाळी 9 ते दुपारी 12.30 व दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत महाड, फलटण, वेळापूर, वाई, कोरेगाव या तालुक्यातील कार्डधारकांनी येऊन माल घेवून जावा.
तसेच 30 व 31 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12.30 व दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत वरील तारखेस येणे शक्य न झालेले व सुट्टीवर आलेल्या जवानांनी माल घेवून जावा.
कॅन्टीन वेळ व मद्य विक्री ही जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार राहील याची नोंद व खबर सर्व कार्डधारकांनी घ्यावी. तूर्तास किराणा सामान कमी असून 22 मे पर्यंत येण्याची शक्यता आहे. वरील नियमांचे पालन न झाल्यास कॅन्टीन बंद ठेवावे लागेल, असे मिलीटरी कॅन्टीनचे व्यवस्थापक कमांडर (निवृत्त) राजेंद्र शिदे यांनी सांगितले.