स्थैर्य, फलटण : सातारा जिल्ह्यामध्ये रास्त भाव दुकान, रास्त भाव दुकान व किरकोळ केरोसीन दुकान परवाना देण्यासाठी ग्रामापंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था व स्वयंसहाय्यता बचत गट यांना रास्त भाव दुकान व दोन्ही दुकानांस परवाना मंजूर करुन देण्यासाठी दि. 10 सप्टेंबर 2020 पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले आहेत. नवीन कायमस्वरुपी दुकान परवाने सर्व पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था) नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महलिा सव्यंसहाय्यता बचत गट व महिलांच्या हसकारी संस्था यांनी ज्या तालुकयातील गावांपैकी, क्षेत्रापैकी ज्या विशिष्ट गावात, क्षेत्रात रास्तभाव दुकान, किरकोळ केरोसीन परवाना चालविण्याची इच्छा आहे. त्यांनी विहित करण्याता आलेल्या अर्जाच्या नमुन्यात संबंधित तहसिलदार यांच्या कार्यालयात विहीत कालावधीत व विहीत नमुन्यात अर्ज सादर करावेत. अर्ज कार्यालयीन वेळेत स्विकारले जातील. विहीत नमुनयातील अर्ज तहसीलदार यांचे कार्यालयात रक्कम रु. 5/- चलनाद्वारे सरकारी खजिन्यात जमा करुन घेऊन दिले जातील. फलटण तालुक्यातील खालील गावांसाठी, क्षेत्रांसाठी परवाने देण्यात येणार आहेत.
“रास्त भाव धान्य दुकान” परवानासाठी फलटण (पी.बी.जेबले), वडजल, तरडगाव (वि.से.सो.), मानेवाडी (ताथवडा), चांभारवाडी, तांबवे, भाडळी खु., तरडफ, सोनवडी खु. या गावात परवाने देणे आहेत. त्या सोबतच “रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ केरोसिन” दोन्ही एकत्रीत परवानासाठी मुळीकवाडी, तरडगाव, परहर खु., सुरवडी, गोळेवाडी पुर्न., सोमंथळी, तिरकवाडी, झडकबाईचीवाडी या गावांसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.