गायींच्या चार्‍यासाठी देणगी देण्याचे आवाहन


दैनिक स्थैर्य । 12 मार्च 2025। फलटण । शहरातील मोकाट गायींना येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यामार्फत दररोज सायंकाळी सायंकाळी सहा वाजता विमानतळ येथे नियमित चारा देण्यात येतो. चारा खरेदीसाठी मोठा खर्च येत आहे. सध्या हा खर्च कार्यकर्ते स्वखर्चातून करत आहेत.

सध्या याठिकाणी गायींच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी पाण्याच्या टाक्या बसविण्यात येणार आहेत. यासाठी काही प्रमाणात निधी लागणार आहे. इच्छुक देणगीदारांनी 8999086135 / 78409 78077 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!