सातारा येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन


दैनिक स्थैर्य । दि. १३ जून २०२२ । सातारा । सामाजिक न्याय व विशेष सहाय विभांतर्गत   मुलीचे शासकीय वसतिगृह, सदरबझार, सातारा येथील 2022-2023 शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून  विद्यार्थींनी प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या अधीक्षकांनी केले आहे.

या वसतिगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, खुला, दिव्यांग, अनाथ (तसेच वसतिगृहातील एकूण प्रवेशापैकी 15 टकके खासबाब म्हणून) प्रवर्गनिहाय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रवेशित विद्यार्थींना निवास व्यवस्था, भोजन शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, खेळाचे साहित्य या सोयी सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहेत.

वसतिगृहातील रिक्त जागेवर इयत्ता 8 वी ते 10 वी व 11 वी तसेच प्रथम आणि पदवीत्तोर पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यालय व महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जातो. अधिक माहितीसाठी मुलींचे शासकीय वसतिगृह, 409/9 सदरबझार, सातारा येथे व 02162-237838 या दूरध्वनी क्रमांकावर तसेच 7588573634 या मोबाईलवर क्रमांकावर संपर्क साधावा.


Back to top button
Don`t copy text!