राजे महाराजांपेक्षा अनुप शहांची कामगिरी अनुपम : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. २९ : करोना या संकटा मध्ये जे काम राजे महाराजे, उद्योगपती यांना जमले नाही ते फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अनूप शहा यांनी करून दाखवले असे गौरउद्गार माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अनूप शहा व सकल जैन फौंडेशन व चावडी चौक मित्रमंडळ यांचा वतीने सुरू असलेल्या अन्नछत्राला भेटी प्रसंगी काढले. नगरसेवक अनुप शहा यांनी सामाजिक जाणिवेतून सुरु केलेल्या अन्नछत्र उपक्रमास अखंड 50 दिवड पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी बोलताना खासदार रणजितसिंह पुढे म्हणाले कि, अनूप शहा यांचे कार्य हे फलटणच्या करोनाच्या इतिहासात लिहताना सुवर्ण अक्षरांनी लिहावे लागणार आहे. नगरसेवक अनुप शहा व सकल जैन समाज ,चावडी चोक मित्रमंडळ यांनी 31 मार्च पासून अखंड 51 दिवस रोज सकाळी व रात्री मिळून 2000 लोकांना अन्न दानाचे कार्य केले आहे. सुमारे 1 लाख लोकांना अन्न दान करण्याचे अखंड काम अनुप शहा यांनी केले आहे. अनूप शहा यांचे कार्य कौतुकास्पद असून ते गौरवास पात्र आहेत. अनुप शहा व सकल जैन समाज, चावडी चोक मित्रमंडळ यांनी 31 मार्च पासून अखंड 51 दिवस रोज सकाळी व रात्री मिळून 2000 लोकांना अन्न दानचे कार्य केले आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!