स्थैर्य, फलटण : कामठवाडी ता. पुरंदर येथील स्टँडजवळ संध्याकाळी ८ वा . पुणेकडे जात असताना सुकलवाडीचे गावचे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय भुजबळ यांची दुचाकी गाडी जाताना घसरल्याने ते रस्त्यावरचं डोक्यावर पडल्याने रक्तबंबाळ अवस्थेत रोडवरचं पडले होते. शेकडो लोक याकडे फक्त बघतचं होते. मदतीला कोणीही पुढे येत नव्हते. फलटणचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बंडखोर नगरसेवक अनुप शहा जेजुरीवरून परत काम ऊरकुन फलटणकडे आपल्या फोर व्हीलर गाडीने परतत असताना त्यांनी हा सर्व प्रकार पहाताच गाडी तत्पर थांबवली व तेथील जमा झालेल्या लोकांच्या घोळक्यास बाजूला करुन गाडीवरून रोडवर घसरून रक्तबंबाळ पडलेल्या युवकास कामठवाडी येथील दयानंद दुर्गाडे यांना मदतीला घेऊन मदतीने आपल्या गाडीत घालुन या युवकास तत्पर कसलाही वेळ न दडवता प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्हे ता. पुरंदर येथील दवाखान्यात नेऊन तत्पर त्यांचेवर प्राथमिक ऊपचार करणेत आले.
याचदरम्यान घडलेला प्रकार सुकलवाडीतील लोकांना तत्पर फोनवरून कळवले. मित्र, नातेवाईक यांनी तत्पर वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. कामठवाडी येथील दयानंद दुर्गाडे यांनी वरील घडलेल्या घटनेची माहीती लोकांना दिली व या लोकांनी मदत करुन वेळीच यांना गाडीतून आणल्याने या ठीकाणी तत्पर ऊपचार झाले. त्यावेळी सर्वांनी हातजोडुन नगरसेवक अनुप शहा, दयानंद दुर्गाडे यांचे आभार मानले.
त्यावेळी शहा यांनी आपले कार्ड त्यांना देऊन काही मदत लागल्यास तत्काळ कळवा असे सांगितले. कार्ड पाहीलेवर सर्वांच्या लक्षात आले हे फलटणचे नगरसेवक अनुप शहा आहेत. त्यावेळी एकजण म्हणाला खरोखरचं आम्ही या नगरसेवक वेळीच मदतीला धाऊन आलेले कामठवाडीचे दयानंद दुर्गोंडे यांच्यात माणसातील देव आज आम्ही पाहीलेला आहे तुमच्या कार्यास आमचा सॅलुट असे ऊदगार काढले.