सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑगस्ट २०२२ । मुंबई । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व नशाबंदी मंडळ यांच्यामार्फत व्यसनमुक्ती संकल्प व ‘हर घर तिरंगा अभियान’ राबविण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागात घेण्यात आली.

सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, सहसचिव दिनेश डिंगळे, उपसचिव विष्णुदास घोडके, राजेंद्र सवणे, अवर सचिव अशोक अहिरे, अश्विनी यमगर, रा. मा. गायकवाड, अनिल अहिरे, कक्षाधिकारी राजेश मांजरेकर, नशाबंदी मंडळ मुंबईचे प्रचारक रायगड जिल्हा संघटक रविंद्र चुरगळ व मुंबई शहरचे जिल्हा संघटक रविंद्र गमरे, वर्षा सरचिटणीस तसेच सामाजिक न्याय विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!