
स्थैर्य, फलटण, दि. २८ : कोळकी येथील अक्षतनगर मधील १ व सस्तेवाडी मधील २ स्वॅब रिजेक्ट झालेले होते. ते काल पुन्हा घेण्यात आले होते. त्या पैकी सस्तेवाडी येथील आणखी एका महिलेला करोनाची लागण झाली असून इतर दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले असल्याची माहिती फलटण उपविभाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली आहे.
काल घेण्यात आलेले २ हेल्थ वर्कर व १ गर्भवती महिलेचा रिपोर्टही निगेटीव्ह आला आहे. कालच्या एकूण ६ पैकी १ पाॅसिटीव्ह व ५ निगेटीव्ह रिपोर्ट आले असल्याची माहितीही फलटण उपविभाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली आहे.