घर-रोजगारासाठी 2.65 लाख कोटींचे आणखी एक पॅकेज


 

स्थैर्य, दि.१३: अर्थमंत्री निर्मला सीतारमण
यांनी गुरुवारी आत्मनिर्भर भारत ३.० ची घोषणा केली. रोजगारवाढीच्या १२
योजना सांगितल्या. आता संघटित क्षेत्रात १५ हजारांपेक्षा कमी मासिक
पगाराच्या नव्या कर्मचाऱ्यांच्या पीएफचे अंशदान केंद्र सरकार भरणार आहे.
‘पीएम शहरी आवास’ची व्याप्ती वाढवली आहे. त्यांनी बिल्डर्सकडून घर खरेदी
करणाऱ्यांना प्राप्तिकरात लाभाचीही घोषणा केली. निर्यातदारांना चालना
देण्यासाठी ३ हजार कोटींच्या मदतीची घोषणा झाली. आत्मनिर्भर भारत अभियान
३.० अंतर्गत एकूण २.६५ लाख कोटींच्या घोषणा झाल्या. त्या जीडीपीच्या १५%
आहेत. सीतारमण म्हणाल्या, पीएम गरीब कल्याण योजनेत १० हजार कोटींची
अतिरिक्त तरतूद केली आहे. यातून मनरेगाची कामे आणि गावांत रस्ते बांधले
जातील. जीएसटी वसुली १०% वाढून १.०५ लाख कोटींवर गेली आहे.

१२ लाख नवी घरे बनवणार, १८ लाख अपूर्ण घरे पूर्ण होतील

उद्देश : रोजगाराची समस्या दूर करणे आणि शहरातील गरिबांसाठी पक्क्या घरांची उपलब्धता.

परिणाम : त्यातून सुमारे ७८ लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळण्याची सरकारला अपेक्षा.

कोरोना लसीसाठी ९०० कोटी रुपये

देशात
कोविड लसीचे संशोधन आणि विकासासाठी अतिरिक्त ९०० कोटी रुपये देण्यात आले
आहेत. ही रक्कम डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजीला मिळेल.

– आजवर २९.८७ लाख कोटी

– ११,०२,६५० कोटी रुपयांचे आत्मनिर्भर भारत अभियान १.०

– ७३,००० कोटी रुपयांचे आत्मनिर्भर भारत अभियान २.०

– ८२,९११ कोटी रुपयांची पीएम गरीब कल्याण अन्न योजना

– १२,७१,२०० कोटी रुपयांचा दिलासा आरबीआयने दिला.

बिल्डर आणि लोकांना रजिस्ट्रीत सवलत

घर/फ्लॅटच्या
खरेदीवर प्राप्तिकरात सवलतीची योजना ३० जून २०२१ पर्यंत लागू राहील.
त्याअंतर्गत सर्कल रेट आणि अॅग्रीमेंट व्हॅल्यूत फरक १०% वरून वाढवून २०%
करण्यात आला आहे.

उद्देश : रिअल इस्टेट आणि घर खरेदीदारांना दिलासा मिळावा.

परिणाम
: त्याचा लाभ फक्त बिल्डरकडून खरेदीवर मिळेल. उदा. सर्कल रेट १ कोटी रु.
आहे आणि मार्केट व्हॅल्यू १.४० कोटी आहे. आधी ती खरेदी केल्यावर १.१० कोटी
रु. वर करलाभ मिळत होता. उर्वरित ३० लाख रु. उत्पन्न मानून कराच्या कक्षेत
येत होते. आता सर्कल रेटमध्ये २०% ची सूट मिळाल्याने घरे खरेदी केल्यावर
१.२० कोटी रुपये करलाभ मिळेल आणि प्राप्तिकर २० लाख रुपयांवर लागेल.

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना

जे नवे कर्मचारी आहेत किंवा १ मार्च-३० सप्टेंबरदरम्यान नोकरी गेली, त्यांना यामुळे फायदा होईल.

उद्देश : नव्या भरतीसाठी कंपन्यांना प्रोत्साहन मिळावे.

परिणाम : १ हजार कर्मचारी असल्यास नव्या कर्मचाऱ्यांच्या पीएफच्या २४% वर सबसिडी. जास्त असल्यास नव्यांच्या १२% योगदानावर २ वर्षे सबसिडी.

आत्मनिर्भर भारताचा अर्थ व व्याप्ती मोठी

योजनेला १८ हजार कोटी रुपये मिळाले. त्यातून ३० लाख गरजू लोकांना स्वत:चे घर मिळू शकेल.

‘प्रधानमंत्री शहरी आवास योजने’साठी अतिरिक्त १८ हजार कोटी रुपये

आपण
आत्मनिर्भर भारताच्या संकल्पासोबत वाटचाल करत आहोत. हे विचार आपल्या
आकांक्षांचा भाग आहेत. आत्मनिर्भर भारताचा अर्थ व कक्षा व्यापक आहे. त्याची
जेवढी खाेली तेवढी उंचीही आहे’ -नरेंद्र मोदी, पंतप्रधान


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!