दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
सध्या घरातील लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण मोबाईलचे बंदी झाले आहेत आणि यातून सर्वांना मुक्ती हवी आहे, पण त्या तोडीचा पर्याय मिळत नाही, हे आपण पाहत आहोत. यावर मार्ग काढण्यासाठी मॅग आणि माऊली फाऊंडेशन संचलित ‘जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर’ फलटण येथे ‘जनसेवा वाचनालय’ या नावाने सुसज्ज वाचनालय रविवार, दि. १० सप्टेंबर २०२३ पासून सुरू होत आहे.
या वाचनालयात लहान मुलांपासून सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तके अत्यंत अल्पदरात वाचण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. यामाध्यमातून नवीन पिढीस वाचनासाठी प्रवृत्त करून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या उपक्रमासाठी आपण वाचनालयाचे सभासद होऊन पुस्तक वाचण्याचा आनंद घेऊ शकता. तसेच वाचनालयाला नवीन किंवा जुनी पुस्तके दान करू शकता व आपण लोकांनी वाचावीत अशा पुस्तकांची नावे सुचवू शकता.
या उपक्रमासाठी जनसेवा वाचनालय, जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर फलटण, स्वरा हाईटस, दुसरा मजला, डी. एड्. चौक. रिंगरोड, फलटण येथे मोबाईल क्र. ९५२९२३३०६७ वर संपर्क साधू शकता, असे आवाहन करण्यात आले आहे.