दैनिक स्थैर्य | दि. १९ जुलै २०२४ | फलटण |
फलटण येथील क्रांतिवीर नाना पाटील चौकात बस स्टॅन्डबाहेर मोठ्या प्रमाणात हातगाडे व खोकीधारकांनी पुन्हा आपली दुकाने थाटली आहेत. फलटण नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी कारवाई करत मागे या ठिकाणची सर्व अतिक्रमणे हटवून नवीन भिंत बांधून रस्ता मोकळा केला होता; परंतु आता पुन्हा या प्रमुख रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे येथे विद्रुपीकरणं होत चालले आहे.
मुख्याधिकारी यांनी कारवाई करून ही अतिक्रमणे कायमची हटवावीत, अशी मागणी होत आहे.