अक्षय्यतृतीयेला ‘संगिनी फोरम’तर्फे चंद्रप्रभू मंदिरात मूलनायक आदिनाथ भगवंतांना उसाच्या रसाचा अभिषेक


दैनिक स्थैर्य | दि. २३ एप्रिल २०२३ | फलटण |
अक्षय्यतृतीयचे जैन धर्मात फार महत्त्व आहे. अक्षय्यतृतीयेदिवशी भगवान वृषभदेव यांना राजा श्रेयांश यांनी उसाचा रस देऊन आहार दिला. या दिवशी दानाला फार महत्त्व असते. फलटण येथील ‘संगिनी फोरम’तर्फे सकाळी चंद्रप्रभू मंदिरात मूलनायक आदिनाथ भगवंतांना उसाच्या रसाचा अभिषेक करण्यात आला.

यावेळी उपस्थित श्रावक-श्राविका यांना ईक्षुरस (उसाचा रस) वाटण्यात आला. तसेच शंकर मार्केटमधील भाजी विक्रेते यांना ऊसाचा रस वाटण्यात आला. भाजी विक्रेते यांनी रस वाटपाबद्दल समाधान व्यक्त करून संगिनी फोरमला धन्यवाद दिले.

कार्यक्रमास फोरमच्या अध्यक्षा अपर्णा जैन, सचिव प्रज्ञा दोशी, खजिनदार मनिषा घडिया, जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षा सविता दोशी, चंद्रप्रभू मंदिरचे विश्वस्त मंगेश दोशी, अरिंजयकाका शहा, उदयकाका शहा, राजेंद्र कोठारी, संगिनी फोरमच्या माजी अध्यक्षा नीना कोठारी, संगिता दोशी व बहुसंख्य संगिनी सदस्या उपस्थित होत्या.


Back to top button
Don`t copy text!