ओमसाई लोकसंचलीत साधन केंद्र फलटणची वार्षिक सभा उत्साहात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 30 जुलै २०२३ | फलटण | महाराष्ट्र शासन अंगीकृत महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा व ओमसाई लोकसंचलीत साधन केंद्र फलटणची १४ वी वार्षिक सभा आशिर्वाद मंगल कार्यालय, फरांदवाडी येथे घेण्यात आली.

सदर सभेसाठी जिल्हा समन्वय अधिकारी डोके सर, तालुका कृषी अधिकारी डांगे सर, कृषी विभागाच्या बोराटे मॅडम, पंचायत समिती येथील फडतरे सर व अ‍ॅड. फाळके पशुधन अधिकारी, आरोग्य अधिकारी कोंडके सर, महिला व बालविकास व प्रकल्प अधिकारी इंगळे सर, महिला स्वरक्षण अधिकारी करपे मॅडम, बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी व प्रतिनिधी पिसे सर, बँक ऑफ इंडियाच्या मेघा मॅडम, लायन्स क्लबच्या अध्यक्षा नीलिमा देशमुख, सदस्य उज्ज्वला निंबाळकर, चोरमले मॅडम, डॉ. पोळ दाम्पत्य व २८ गावातील १५०० महिला व सर्व सीआरपी सहयोगिनी ओमसाई लोकसंचलीत साधन केंद्रच्या सर्व कार्यकारिणी नगर परिषद शिरतोडे सर, शिंदे सर उपस्थित होते.

सूत्रसंचालन व्यवस्थापक शिला घाडगे यांनी केले व प्रास्ताविक लेखापाल पूजा अडसूळ यांनी केले. प्रांजली बचत गटाच्या सर्व सभासद यांच्या लेझीम पथकाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.


Back to top button
Don`t copy text!