ओमसाई लोकसंचलित साधन केंद्र फलटण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ५ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
महिला आर्थिक विकास महामंडळ, सातारा अंतर्गत ओमसाई लोकसंचलित साधन केंद्र, फलटण या संस्थेची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी पार पडली. या सभेसाठी विभागीय सल्लगार पुणे विलास बच्चे, जिल्हा समन्वयक अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा विजय डोके, व पशूसंवर्धन अधिकारी फाळके, बँक ऑफ इंडियाच्या हर्षा, ग्रामीण व शहरी पोलीस स्टेशन निर्भया पथकाच्या भोसले तसेच संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

यावेळी उत्कृष्ट गट पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ओमसाई सीएमआरसीच्या सर्व सहयोगिनी व सर्व सीआरपी यांनी सहकार्य केले. ही वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली

सूत्रसंचालन भारती शिंदे यांनी केले. प्रास्ताविक व्यवस्थापक शिला घाडगे यांनी केले व कार्यक्रमाचे अध्यक्ष सीमा सतीश यांनी आभार मानले.

कार्यक्रमच्या ठिकाणी स्टॉल लावण्यात आले होते, पंचसूत्री थीम सीएमआरसी सर्व स्टाफने मिळून तयार केली होती.


Back to top button
Don`t copy text!