दैनिक स्थैर्य | दि. ३१ जुलै २०२३ | फलटण |
जय भवानी शिक्षक-शिक्षकेतर सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित गिरवी या पतसंस्थेची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ३० जुलै रोजी नवलबाई मंगल कार्यालय या ठिकाणी सकाळी ११.०० वाजता श्री. दत्तात्रय नाना भिवरकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.
याप्रसंगी सेवानिवृत्त सभासदांचा संपूर्ण पोशाख देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच सभासदांच्या शैक्षणिक गुणवत्ताधारक मुलांचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय नाना भिवरकर यांनी अहवालाचे वाचन करून संस्थेच्या सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर केला.
सेवानिवृत्त सभासदांनी आपले मनोगतामध्ये संस्था अधिक प्रगतीपथावर जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
स्व. चिमणराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची स्थापना सन १९८३ मध्ये झाली असून या संस्थेचे २२० सभासद आहेत. तसेच जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या सचिव श्रीमती शारदादेवी सूर्याजीराव ऊर्फ चिमणराव कदम (काकी) व जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. सह्याद्री भैय्या चिमणराव कदम यांचे संस्थेस वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन होते.
या सभेस संचालक मंडळ, सभासद बंधू आणि भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अजित कदम सर यांनी केले तर आभार श्री. मसुगडे सर यांनी मानले.