दैनिक स्थैर्य | दि. २० फेब्रुवारी २०२३ | फलटण |
सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेट स्कूल व ज्युनियर कॉलेज गुणवरे या ठिकाणी १६ फेब्रुवारी २०२३ रोजी वार्षिक सांस्कृतिक आनंदोत्सव ‘लक्ष्य २०२३’ मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समिती सदस्य श्री. संजय कापसे, श्री. कृष्णनाथ उर्फ दादासाहेब चोरमले (अध्यक्ष, महात्मा शिक्षण संस्था, फलटण) श्री. संजय पाटील (सभापती, काळभैरवनाथ विद्यालय गुरसाळे), प्रेमवारी फिल्म प्रॉडक्शन धनगरवाडा वेबसिरीज टीम श्री. पांडुरंग पवार, सौ. सुलोचना पवार श्री. विशाल पवार सर (सचिव, सरस्वती शिक्षण संस्था), सौ. प्रियांका पवार मॅडम (संचालिका, सरस्वती शिक्षण संस्था तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका), प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. किरण भोसले सर, समन्वयिकासौ. सुप्रिया सपकाळ मॅडम उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत करून सरस्वती प्रतिमेचे पूजन व अखंड महाराष्ट्राचे दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. श्री. विशाल पवार सर(सचिव, सरस्वती शिक्षण संस्था) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात नर्सरी ते इ.सातवी मधील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून गीतगायन, नृत्य, नाटिका, लोकनृत्य असे विविध कलागुण दाखवत वाहवा मिळवली.
इ. सहावी व सातवीमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेला ‘गड आला पण सिंह गेला’ हा प्रसंग कार्यक्रमाचे आकर्षण बिंदू ठरला. या विद्यार्थ्यांनी हा प्रसंग हुबेहूब सादर केला. मावळ्यांची स्वराज्याविषयी असलेली निष्ठा बघून पालक भारावून गेले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालकांनी उपस्थित राहून या बालकांचे कौतुक केले.
सूत्रसंचालन आणि आभार शाळेतील समन्वयिका सौ. सुप्रिया सपकाळ आणि शिक्षिका निकिता मुळीक यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने झाली.