दैनिक स्थैर्य । दि.०४ जानेवारी २०२२ । फलटण । ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मलवडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. जंयती कार्यक्रमाच्या निमित्ताने पुष्पहार अर्पण करून विविध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे माननीय श्री बबनराव मदने सातारा जिल्हा अध्यक्ष भारतीय मानव अधिकार फाउंडेशन यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबर बाहेरचे ज्ञान हे विद्यार्थ्यांना असावे असे सांगितले. व भारतीय मानव अधिकार फाउंडेशन च्या कामाविषयी सविस्तर माहिती दिली.
मलवडी गावचे सरपंच बाजीराव तरडे यांनी आपल्या भाषणांमध्ये झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देऊन, विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या वाढदिवसा निमित्ताने त्या विद्यार्थ्याचा केक कापून वाढदिवस साजरा केला जाईल व त्या विद्यार्थ्याला त्याच्या जन्मदिवसा दिनी एक झाड देऊन त्या विद्यार्थ्याला झाडाची काळजी घेण्यास सांगितले. यासाठी स्वतः सरपंच यांनी विद्यार्थ्यांना वाढदिवसा निमित्ताने केक व झाड देण्याचे आश्वासन दिले.
जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विवेक स्वामी यांनी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी दिलेले योगदान व शिक्षणाचा रचलेला पाया याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शकील सय्यद यांनी आपल्या भाषणामध्ये सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, तसेच गावातील नागरिक यांचे स्वागत करून, विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी दिलेले ज्ञान आणि योगदान याविषयी विद्यार्थ्यांना महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोबडे सर यांनी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
नेहरू युवा मंडळ मलवडी यांच्या माध्यमातून,बक्षीस म्हणून मिडल ठेवण्यात आलेली होती. ही सर्व मिडल मान्यवरांच्या हस्ते अतिशय सुंदर वकृत्व करणाऱ्या, विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते पाचवी असा एक गट व सहावी ते आठवी एक गट तयार करून यामधूनच विद्यार्थ्यांचे एक, दोन ,तीन, चार, पाच असे क्रमांक काढून विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक अनिल कोळेकर यांनी मानले.
कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळा मलवडीचे सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक अनिल कोळकर, श्री माने, श्री गडकरी, श्री स्वामी, श्री बोबडे, श्री भंडलकर, सरपंच बाजीराव तरडे, दत्तू रुपनवर, धनाजी रिटे, राजेंद्र रिटे, आप्पा रुपनवर, मारुती रुपनवर, शकील सय्यद, कोंडीबा धायगुडे, संजय टकले, रणधीर भोसले, सौ. बीचुकले, सौ. बागाव तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.