म.अंनिसच्या सातारा जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी निवड जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२१ । सातारा । सातारा जिल्हा म.अंनिसच्या 2021-22 या वर्षासाठी जिल्हा कार्यकारिणी निवडीची बैठक ऑनलाईन नुकतीच पार पडली. यामध्ये सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून तारळे गावाचे माजी मुख्याध्यापक विलासराव भांदिर्गे, तारळे, ता. पाटण यांची जिल्हाध्यक्ष म्हणून तर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून वंदना माने, सातारा, व जिल्हा प्रधान सचिव म्हणून अ‍ॅड. हौसेराव धुमाळ, सातारा यांची एकमताने निवड करण्यात आली.

राज्य निरीक्षक म्हणून म.अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य प्रशांत पोतदार व हमीद दाभोलकर प्रमुख उपस्थित होते. त्यांनी सर्व नव नियुक्त पदाधिकार्‍यांचे स्वागत व अभिनंदन केले. सातारा जिल्ह्यातील कामाच्या वाढीच्या दृष्टीने म.अंनिसच्या विविध विभागांच्या समित्यांवर पुढीलप्रमाणे एकमताने निवड करण्यात आली. 1- बुवाबाजी संघर्ष विभाग – सीताराम चाळके -कराड, मोहसीन शेख-रहिमतपूर, 2 – वार्तापत्र व प्रकाशन विभाग – प्रकाश खटावकर -सातारा, शिवाजी शिंदे – रहिमतपूर, 3- वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प विभाग – सुभाष कळसे- वाई, 4- महिला विभाग – अंकिता पवार -पिंपरी-रहिमतपूर, सातारा, 5 – विविध उपक्रम- विकास तोडकर – सातारा, 6- जात निर्मूलन व विवेकी जोडीदार निवड विभाग – तानाजी इंगळे-औंध, प्रमोद भिसे -वाई, 7 – मानसिक आरोग्य विभाग – राजेंद्र पवार – सातारा 8- युवा व विवेक वाहिनी विभाग – प्रशांत जाधव- औंध, 9- सोशल मिडीया विभाग – हेमंत जाधव – कोरेगाव, रणवीर गायकवाड – वाई, 10- प्रशिक्षण विभाग – सी.आर.बर्गे-कोरेगाव 11- कायदा विभाग – अ‍ॅड. मिलिंद पवार- सातारा 12 – सांस्कृतिक विभाग -विजय पवार -सातारा.


Back to top button
Don`t copy text!