दैनिक स्थैर्य । दि. २६ सप्टेंबर २०२२ । मुंबई । कष्टाची कामे करताना कामगारांना मिळणार मोबदला आणि मालकांकडून होणारी पिळवणूक पाहून त्यांचे मन तळमळायचे. या तळमळीतूनच त्यांनी माथाडी कामगार चळवळीचा लढा सुरु केला. तत्कालीन लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करून माथाडी कायदा अमलांत आणला. त्यांच्या महान कार्यामुळे आज माथाडी कामगारांना स्वतःची ओळख मिळाली आहे. याचे खरे श्रेय त्यांनाच जाते. आण्णासाहेब पाटील यांनी लाखो कष्टकरी, मालवाहू माथाडी कामगारांना ताठ मानेने जगायला शिकविले. माथाडी कामगारांनी त्यांच्या स्मृती जपताना त्यांच्या कार्याचे मोठेपण आयुष्यभर जपले पाहिजे असे मत
हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष विकास मयेकर यांनी व्यक्त केले. श्रमिकांचे भाग्यविधाते व माथाडी कामगारांचे आराध्यदैवत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची ८९ वी जयंती आयोजित करण्यात आली होती निमित्ताने ते बोलत होते. असंख्य माथाडी कामगारांच्या उपस्थितीत अण्णासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर शेकडो हातगाडी कामगारांना चादरींचे वाटप ज्येष्ठ शिवसैनिक श्री बाबा परुळेकर व अध्यक्ष श्री विकास मयेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरचिटणीस बाजीराव मालुसरे, शंकर झोरे, सुरेश कोळी, उमेश मिटगावकर, अंबादास गणेशकर, नाथा दळवी, संदीप चिखले, सलीमभाई, सुहास धुमडे, सुनील गुप्ता, अजय छोटू आदी मान्यवर उपस्थित होते.