७१३ जनावरे नियमित औषध उपचाराने बरी


दैनिक स्थैर्य । दि. ६ ऑक्टोंबर २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यात फलटण, सातारा, खटाव, कराड, पाटण, कोरेगाव, माण, खंडाळा, जावली व वाई  असे 10 तालुक्यातील 128 गावांमध्ये लंम्पी चर्म रोगाची लागण झाली आहे. आज अखेर गाय 2486 व 320 बैल असे एकूण 2806 जनावरांस लंम्पी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच आज दिनांक 06/10/2022  रोजी जिल्हयामध्ये 12 जनावरांचा मृत्यु झाला असून (आजअखेर 145 गायी + 49 बैल असे एकूण 194 पशुधन मृत झाले आहे. आजअखेर 659 गाई व 54 बैल असे एकूण 713 जनावरे नियमित औषध उपचाराने बरी झालेली आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली आहे.

लंम्पी चर्म रोग उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व आवश्यक औषधे, शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकीत्सालायांमध्ये उपलब्ध आहेत. 20 वी पशुगणनेनुसार जिल्हयातील गोवर्गीय पशुधनाची संख्या 352436 असुन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार  आजअखेर बाधित गाव व  बाधित गावाचे ५ किमी परिघातील एकूण 782 गावांमधील गोवर्गीय  196186 व  इतर अबाधित क्षेत्रातील गावांमधील गोवर्गीय  150914 असे एकूण 347100 पशुधनाचे लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!