दैनिक स्थैर्य | दि. ०३ नोव्हेंबर २०२१ | मुंबई | यंदा दिवाळीला उत्सवाच्या आनंदामध्ये अधिक उत्साहाची भर करत एंजेल वनने ‘शगुन के शेअर्स’ मोहिम पुन्हा सुरु केली आहे. फिनटेक व्या सपीठाचा संदेश आहे ‘एक नयी शुरूवात शगुन के शेअर्स के साथ’ म्हणजेच मोहिम आधुनिक काळातील गुंतवणूकदारांना यंदा सणासुदीच्या काळात त्यांचा गुंतवणूक प्रवास सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. शुभ भाग्याचे प्रतीक मानले जाणा-या शेअर बाजारातील गुंतवणूका दीर्घकालीन होल्डिंग्ज आहेत, ज्या फायदेशीर परतावे देतात.
एंजेल वन लिमिटेडेचे चीफ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी म्हणाले, “आमच्या मागील ‘शगुन के शेअर्स’ मोहिमांना मिळालेले यश पाहता आम्ही शेअर बाजार बँडवॅगनवर अधिकाधिक गुंतवणूकदारांचा समावेश करण्यासाठी परतलो आहोत. लोक दिवाळीच्या दिवशी संपत्ती व शुभ भाग्याचे प्रतीक असलेली देवी लक्ष्मीची पूजा करतात. म्हणूनच हा दिवस दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी शुभ मानला जातो. या मोहिमेचा भाग म्हणून आमच्या संशोधन टीमने मुहुरत ट्रेडिंगसाठी अव्वल शेअर्सची निवड केली आहे. लोक शगुनचा टोकन म्हणून त्यांचा गुंतवणूक प्रवास सुरू करण्यासाठी हे शेअर्स खरेदी करू कतात.”
एंजेल वन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण गंगाधर म्हणाले, “एंजेल वनने यंदाच्या वर्षात आतापर्यंत लक्षणीय कामगिरी केली आहे. आमच्या अत्याधुनिक उपाययोजनांसह आम्ही ग्राहकांच्या अनुभवामध्ये मूल्याची भर करू शकलो आहोत. आमच्या ‘शगुन के शेअर्स’ मोहिमेचे जनरेशन झेड व मिलेनियल्सवर लक्ष्य आहे, ज्यांना सणासुदीच्या काळादरम्यान अव्वल पिक्समध्ये गुंतवणूक करत लाभ मिळू शकतो. आ म्ही आमच्या युजर्सना त्यांची गुंतवणूक व व्यापार अनुभव पुनर्परिभाषित करणा-या तंत्रज्ञान-संचालित उपायोजना देत राहू.”
शेअर बाजारच्या परंपरांशी बांधील राहत कंपनी नवीन गुंतवणूकदारांमध्ये स्पेशल वन-अवर मुहुरत ट्रेडिंगबाबत जागरूकता देखील निर्माण करत आहे. दिवाळीच्या दिवशी म्हणजेच ४ नोव्हेंबर २०२१ रोजी गुंतवणूकदार व व्यापारी सायंकाळी ६.१५ ते सायंकाळी ७.१५ वाजेपर्यंत शगुन म्हणून शेअर्स खरेदी करू शकतात. मुहुरत ट्रेडिंग प्रतिकात्मक प्रथा आहे, जेथे शेअर बाजार दिवाळीच्या दिवशी एक तासासाठी खुला होतो. हिंदू नववर्षाचा शुभारंभ म्हणून दिवाळीला मुहुरूत ट्रेडिंग वर्षभर संपत्ती व समृद्धता देण्यासाठी ओळखला जातो. एंजेल वनच्या मुहुरत ट्रेडिंगमध्ये अव्वलस्थानी आहेत- अशोक लेलॅण्ड, रामकृष्ण फॉर्गिंग्स, एचडीएफसी बँक, फेडरल बँक, स्टोव्हक्राफ्ट आणि लेमन ट्री हॉटेल.
एंजेल वन आपल्या अद्वितीय मोहिमांसह भावी स्मार्ट गुंतवणूकींमध्ये अग्रस्थानी आहे. फिनटेक व्यासपीठ स्टार्टअप मानसिकतेसह नियमन-आधारित गुंतवणूक इंजिन एआरक्यू प्राइम, नॉलेज हाऊस आणि नवोदित गुंतवणूकदारांपासून विद्यमान गुंतवणूकदार व व्यापा-यांच्या गरजांची पूर्तता करणारे फन-लर्निंग आधारित गुंतवणूकार शैक्षणिक व्यासपीठ स्मार्ट मनी अशा विविध सेवांच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देत आहे.