दैनिक स्थैर्य । दि. २३ डिसेंबर २०२१ । मुंबई । एंजेल वन लिमिटेड या फिनटेक प्लॅटफॉर्मने वक्रांगी डिजिटल व्हेंचर्स लिमिटेडसोबत भागीदारी केली असून त्यातून आपल्या भारतइझी सुपर अॅप आणि नेक्स्टजेन केंद्रांद्वारे वक्रांगीच्या ग्राहकांना डिमॅट खाते उघडण्यासाठी मदत केली जाईल.
या भागीदारीच्या माध्यमातून एंजेल वनकडून आपली विविध प्रकारची उत्पादने आणि सेवा देशभरातील ग्राहकांना दिल्या जातील आणि प्रामुख्याने टीअर २ व ३ आणि त्यापलीकडील शहरांवर लक्ष केंद्रित केले जाईल. एंजेल वनला वक्रांगीच्या व्यापक ग्राहक पायापर्यंत पोहोचता येईल आणि त्याद्वारे ज्या बाजारपेठांमध्ये ती पोहोचलेली नाही तिथपर्यंत ती पोहोचू शकेल. कंपनीचे स्मार्ट मनी, डिजिटल ऊर्जाप्राप्त सुयोग्य केवायसी प्रक्रिया, ग्राहक ऑनबोर्डिंग आणि तंत्रज्ञानाने अद्ययावत उत्पादने एक चांगला ग्राहक अनुभव देऊ शकतील.
एंजेल वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर म्हणाले की, “आम्हाला टायर २, ३ आणि त्यापलीकडील शहरांमध्ये आमच्या व्यापक अद्ययावत सेवा नवीन युगाच्या गुंतवणूकदारांना देण्यासाठी वक्रांगी डिजिटल व्हेंचर्स लिमिटेडसोबत भागीदारी करताना खूप आनंद होत आहे. आम्हाला या तंत्रज्ञानावर आधारित भागीदारीबाबत खूप उत्साह आहे, कारण आम्हाला त्यातून जास्तीत-जास्त गुंतवणूकदारांना सहभागी करून घेणे आणि गुंतवणुकीची संस्कृती अधिक सखोल करणे शक्य होईल.”
वक्रांगी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि समूह मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिनेश नंदवाना म्हणाले की, “आम्हाला एंजेल वनसोबत भागीदारी करताना खूप आनंद होत आहे. एंजेल वनसोबतची ही भागीदारी देशाच्या सर्वांत दुर्गम ठिकाणी असलेल्या आमच्या ग्राहकांना आमच्या डिजिटल व्यासपीठांद्वारे तसेच नेक्स्टजेन वक्रांगी केंद्रांच्या नेटवर्कद्वारे विविध प्रकारच्या गुंतवणुका आणि वित्तीय सेवा देऊ शकेल. यातून आमच्या ग्राहकांसाठी मूल्य देण्याची मोठी संधी आम्हाला मिळाली आहे. ही भागीदारी विविध प्रकारच्या सेवा देण्याच्या आमच्या धोरणाला आणखी प्रोत्साहित करेल.”