एंजल वनची व्यावसायिक घौडदौड सुरूच

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ एप्रिल २०२३ । मुंबई । एंजल वन लिमिटेडने ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त झालेली तिमाही व वर्षासाठी त्यांचे लेखापरीक्षित एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीचा अॅव्हरेज डेअली टर्नओव्हर (एडीटीओ) २०२३ तिसऱ्या तिमाहीच्या १४ .५ ट्रिलियन रूपयांच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत १८.५ ट्रिलियन झाला आहे ज्यामध्ये तिमाही-ते-तिमाही २७.७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तसेच आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ६.५ ट्रिलियन रूपयांच्या तुलनेत यात वार्षिक ११०.४ टक्क्यांची वाढ झाली असून आर्थिक वर्ष २०२३ मध्ये १३.६ ट्रिलियन रूपयांवर पोहोचला आहे.

एंजल वनचा एकत्रित एकूण महसूल २०२३च्या तिसऱ्या तिमाहीतील ७,५९७ दशलक्ष रूपयांच्या तुलनेत तिमाही-ते-तिमाही ९.४ टक्क्यांच्या वाढीसह २०२३ च्या चौथ्या तिमाहीत ८,३११ दशलक्ष रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये २२,९७१ दशलक्ष रूपयांच्या तुलनेत यात वार्षिक ३१.५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ३०,२११ दशलक्ष रूपयांवर पोहोचला आहे.

कंपनीचा एकत्रित ईबीडीएटी २०२३च्या तिसऱ्या तिमाहीतील ३,०९९ दशलक्ष रूपयांच्या तुलनेत तिमाही-ते-तिमाही १९.६ टक्क्यांच्या वाढीसह २०२३ च्या चौथ्या तिमाहीत ३,७०५ दशलक्ष रूपयांवर पोहोचला आहे. ईबीडीएटी मार्जिन (निव्‍वळ उत्‍पन्‍नाच्या टक्‍के) २०२३च्या चौथ्या तिमाहीत ५७.५ टक्क्यांपर्यंत वाढले. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ८,५५४ दशलक्ष रूपयांच्या तुलनेत एकत्रित ईबीडीएटी वार्षिक ४२.९ टक्क्यांच्या वाढीसह आर्थिक वर्ष २०२३ मध्ये १२,२२१ दशलक्ष रुपयांवर पोहोचला आहे. ईबीडीएटी मार्जिन (निव्वळ उत्पन्नाच्या टक्के) आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ५३.३ टक्क्यांपर्यंत वाढले.

कंपनीचा कार्यरत असलेल्‍या कार्यसंचानांमधून एकूण करोत्तर नफा २०२३च्या तिसऱ्या तिमाहीतील २,२८० दशलक्ष रूपयांच्या तुलनेत तिमाही-ते-तिमाही १७.१ टक्क्यांच्या वाढीसह २०२३ च्या चौथ्या तिमाहीत २,६७० दशलक्ष रूपयांवर पोहोचला आहे. तसेच आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ६,२५१ दशलक्ष रूपये असणारा   एकूण करोत्तर नफा वार्षिक ४२.४ टक्क्यांच्या वाढीसह आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ८,९०२ दशलक्ष रुपयांवर पोहोचला आहे.

अंतरिम व अंतिम लाभांशाचे संयोजन म्हणून संचालक मंडळाने १० रुपये किंमतीच्या प्रत्येक समभागासाठी १३.६० रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे, हा लाभांश तिमाहीतील एकत्रित करोत्तर नफ्याच्या ४३ टक्क्यांशी समतुल्य आहे.

एंजल वनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश ठक्कर म्हणाले, ‘‘आर्थिक वर्ष २०२३ एंजल वनसाठी प्रबळ वर्ष आहे. कंपनीने सर्व कार्यसंचालन घटक वितरित केले आहेत. एंजल वन आपल्या सुपर-अॅप धोरणाच्या माध्यमातून भागीदारी करण्यास आणि विविध उत्पादने प्रदान करण्यास उत्तमरित्या स्थित आहे. हे व्यवसाय मॉडेल सर्व कोहोर्ट्समध्ये लाभदायी युनिट इकोनॉमिक्स देण्यासाठी प्रबळ आहे. आमच्या फिनटेक मॉडेलच्या प्रबळपणामधून सरासरी क्लायण्ट महसूलाच्या पहिल्या ३ वर्षांच्या आधारावर ७.८एक्सचे अत्यंत उत्तम एलटीव्ही: सीओए दिसून येते. व्यासपीठावर क्लायण्ट्सचा सहभाग वाढत असताना एलटीव्ही:सीओए दीर्घकाळापर्यंत वाढ करत राहिल.”


Back to top button
Don`t copy text!