स्थैर्य, कराड, दि.१०: राज्य पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्या तारळे-मुरुड (ता. पाटण) विभागातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलांनी नुकतेच आपल्या मागण्यांचे निवेदन खासदार श्रीनिवास पाटील यांना दिले. अध्यक्षा माया जाधव, कार्याध्यक्षा सुनंदा पवार आणि त्यांच्या सहकारी महिला उपस्थित होत्या.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधनाऐवजी पगार द्यावा, निवृत्त झालेल्या व आगामी काळात निवृत्त होणाऱ्या अंगणवाडी महिलांना दरमहा पाच हजार रुपये निवृत्तीवेतन द्यावे, रिक्त जागा तातडीने भराव्यात, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. त्यावेळी खासदार पाटील यांनी महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर तसेच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याशी संपर्क साधून महिलांना निश्चित न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन दिले.