दैनिक स्थैर्य । दि. १७ मार्च २०२३ । बारामती । बारामती एमआयडीसी मधील फेरेरो इंडीया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने सीएसआर फंडाच्या माध्यमातून गोजुबावी मधील बालक व विद्यार्थी यांच्या साठी अंगणवाडी शाळेची इमारत बांधून देण्यात आली .
गुरुवार दि.१६ मार्च रोजी फेरेरो इंडिया च्या सी. एस. आर. च्या आशिया आणि पॅसिपीक देशाच्या प्रमुख क्लाउडिया मिलो यांच्या हस्ते शुभारंभ झाला. या प्रसंगी प्लांट हेड स्मिता गायकवाड प्लांट एच.आर. हेड उमेश दुगानी , आय.आर.मॅनेजर, योगेश मगदूम ,
आय.ए., सी.सी. आणि सी.एस.आर. मॅनेजर, सोनल माळी व गोजुबावी ग्रामपच्यात सरपंच माधुरी कदम व महेश नवले, अंगणवाडी सेविका अलका गटकळ, सुमित्रा सावंत, कामिनी भोसले, आशा जाधव. मदतनीस जयश्री आटोळे, कांता जाधव, अंजना जाधव आदी मान्यवर व विद्यार्थी, ग्रामस्थ,पालक उपस्तीत होते.
बालकाचा सर्वांगीण विकास करत निरोगी व सुदृढ बालक बनवण्यासाठी आणि बालकांना उत्तम शिक्षण देण्यासाठी फेरेरो इंडिया कटिबद्ध असल्याचे क्लाउडिया मिलो यांनी सांगितले. सामाजिक भान व जाण ठेवत फेरेरो इंडिया सर्व स्तरावर कार्य करीत असल्याचे प्लांट हेड स्मिता गायकवाड यांनी सांगितले. क्लाउडिया मिलो यांनी विद्यार्थी व ग्रामस्थांशी संवाद साधला व वृक्षारोपण केले. आभार सरपंच माधुरी कदम यांनी मानले.