दैनिक स्थैर्य । दि. ०६ जुलै २०२२ । सातारा । याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरे बुद्रुक गावी राहावयास असताना 30 रोजी घराशेजारील कॅनॉलवरून पळवून नेऊन तिच्यावरती आरोपी नितीन अर्जुन जाधव वय 24 रा. अंदोरी ता. खंडाळा याने अंदोरी गावी दिनांक 30/3/2018 ते 28/4/2018 पर्यंत वेळोवेळी आठ ते नऊ वेळा तिचे संमतीशिवाय अत्याचार केला म्हणून मामाच्या फिर्यादीवरून लोणंद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पीएसआय एस के कुटे यांनी तर दोषारोप पत्र पीएसआय गणेश पवार यांनी केले होते.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस उपअधिक्षक तानाजी बरडे व सपोनी विशाल वायकर यांनी विशेष लक्ष पुरविले. गुन्ह्यातील फिर्यादी व तसेच घटनास्थळ पंच साक्षीदार यांनी साक्ष दिल्या होत्या.
त्यानुसार विशेष जिल्हा न्यायालयाने न्या. पटणी यांनी पोक्सो ॲक्ट सहा प्रमाणे दोषी धरून आरोपी नितीन अर्जुन जाधव वय 24 रा. अंदोरी तालुका खंडाळा यास दहा वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड न दिलेस तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून अॅड. मुके यांनी काम पाहिले.