संत हरिबाबा महाराज यांचे सचित्र चरित्र लोकजागर प्रकाशनतर्फे होणार प्रकाशित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटणचे आध्यात्मिक भूषण म्हणून लौकिक असलेले व फलटण परिसरातील अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले संत हरिबाबा महाराज यांचे स्वतंत्रपणे सचित्र चरित्र ‘लोकजागर प्रकाशन’ तर्फे प्रकाशित होणार आहे.

संत हरिबाबा महाराज यांचे वास्तव्य फलटणमध्ये तत्कालीन फलटण संस्थानचे अधिपती कै. श्रीमंत मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकाळामध्ये होते. तसेच त्यांचा फलटणमधील उघडा मारुती मंदिरामध्ये प्रकट झाल्याचा काळ तिथीनुसार प्रगटदिन म्हणून आजही अश्विन शुद्ध १२ रोजी फलटणकर श्रद्धेने श्री हरिबाबांचा जयघोष करीत साजरा करीत असतात. श्री हरिबाबा यांचे वास्तव्य शिंगणापूर, पणदरे, लाटे, नातेपुते, फलटण असे होते. त्यांच्या कृपेचा प्रसाद राजेरजवाडे, श्रीमंत, गरीब, अपंग, मतिमंद, जर्जर रुग्ण अशा सर्वांनाच लाभला आहे. त्याची प्रचिती आजही भक्तांना येते.

अशा या सत्पुरूषाचे सर्वांगीण चरित्र म्हणजे भक्तांच्या पुढील पिढीचा ठेवाच आहे. त्यासाठी लवकरच श्री सद्गुरु हरिबाबांचे नव्या पिढीसाठी सविस्तर चरित्र लोकजागर प्रकाशनतर्फे प्रसिद्ध होणार आहे. ज्या भक्तांना श्री सद्गुरु हरिबाबा यांचा आशीर्वाद, कृपाप्रसाद, साक्षात्कारी अनुभव अशी अनुभूती लाभली असेल अशा भक्तांनी आपले अनुभव टंकलिखित स्वरूपात ई – मेल अ‍ॅेहळीुंरज्ञरवशसारळश्र.लेा वर किंवा समक्ष / पोस्टाने संपादक, लोकजागर, ३२२, कसबा पेठ, शंकर मार्केट, फलटण ४१५ ५२३ या पत्त्यावर दि. ५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत पाठवावेत, असे आवाहन लोकजागर प्रकाशनच्यावतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!