दैनिक स्थैर्य | दि. 22 डिसेंबर 2023 | फलटण | महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक या परीक्षेमध्ये फलटण पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे यांचे कन्या कु. अमृता ढेकळे हिची विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाली आहे.
नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा जाहीर करण्यात आला आहे. हिच्या निवडीबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, फलटण तालुका दूध पुरवठा संघाचे माजी चेअरमन प्रा. भिमदेव बुरुंगले, महाराष्ट्र केसरी पै. बापूराव लोखंडे, फलटण पंचायत समितीची माजी सभापती शंकरराव माडकर, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन पै. बजरंग खटके, फलटण तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष पै. बजरंग गावडे, सरपंच अंकुश लोखंडे, प्रा. नवनाथ लोखंडे यांच्यासह विविध मान्यवरांनी केला.