अमोल आढाव पोलीस पाटील संघटनेचे नवे तालुकाध्यक्ष


दैनिक स्थैर्य । दि. 02 ऑगस्ट 2025 । फलटण । गुणवरे गावचे पोलीस पाटील अमोल आढाव यांची पोलीस पाटील संघटनेच्या तालुकाध्यक्ष तर वडले गावच्या पोलीस पाटील सौ. स्वाती घनवट व खटकेवस्ती गावचे पोलीस पाटील राजेंद्र धुमाळ यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ या भिकाजीराव पाटील स्थापित नोंदणीकृत व अधिकृत असणाऱ्या संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्ष व पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम मौजे फलटण येथील माळजाई मंदिरात संपन्न झाली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब शिंदे – पाटील यांच्या सूचनेनुसार सदरील कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस पाटील संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर व निरीक्षक म्हणून सातारा जिल्हाध्यक्ष प्रदीप गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोलीस पाटलांच्या विविध मागण्या व संघटनेच्या संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून पोलीस पाटलांच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील गाव कामगार संघ या अधिकृत संघटनेच्या माजी पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपल्याने फलटण तालुका अध्यक्ष व पदाधिकारी निवडीचा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला यामध्ये

फलटण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या सहसचिव – सौ. रसिका भोसले, संपर्कप्रमुख – हनुमंत सोनवलकर, संघटक – सौ. प्रणाली बोडके, मकरंद पखाले, सल्लागार – अशोक गोडसे, हनुमंतराव सोनवलकर, सुरेश चव्हाण, अमित भोईटे, प्रदीप गाढवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सदर निवडीबद्दल प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग खटके, डॉ. धनाजी आटोळे, प्राचार्य आनंदराव आढाव, शिवलाल गावडे, भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे सचिव राहुल कणसे, माजी सरपंच मनोज गावडे, पोलीस पाटील विकास शिंदे, युवराज सांगळे, यांच्यासह फलटण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, गोखळी गुणवरे ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!