पोळने सोने व पैशाच्या हव्यासापोटीच खून केलेमाफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिची न्यायालयात साक्ष

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.२०: वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने शनिवारी सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणीवेळी संतोष पोळ याने माझ्यासमोर मंगला जेधे, सलमा शेख, भंडारी यांचा इंजेक्शन देऊन खून केला असून त्यानंतर आनंद व्यक्त केला. तसेच बहुतेक खून हे पोळने सोने व पैशाच्या हव्यासापोटी केल्याची साक्ष माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने न्यायालयात दिली. दरम्यान, पोळच्या सांगण्यावरून आपणच मंगला यांना पोळच्या पोल्ट्री फार्मवर आणल्याचेही तिने यावेळी सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणार्‍या वाई-धोम हत्यांकाड खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एन.एल. मोरे यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम सरकार पक्षातर्फे काम पाहत असून शनिवारी ते न्यायालयात उपस्थित होते. 

मी पोळच्या संपर्कात येण्यापूर्वीच त्याने तीन खून केले होते. तर मी संपर्कात आल्यानंतर मंगला जेधे, सलमा शेख व नथमल भंडारी यांचे खून केले. यातील बहुतेक खून हे पोळ याने पैशाच्या व सोन्याच्या हव्यासापोटीच केल्याची साक्ष ज्योती मांढरे हिने न्यायालयात दिली. शनिवारी जेष्ठ वकील उज्वल निकम यांनी ज्योतीची साक्ष घेतली. त्यानंतर पोळचे वकील श्रीकांत हुडगीकर यांनी उलट तपासणीला सुरूवात केली. परंतू न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्याने पुढील सुनावणी 2 जानेवारीला होणार आहे. दरम्यान पोलिसांनी सुनावणीवेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवल्याने निकम व हुडगीकर यांच्याशिवाय इतर कोणालाही न्यायाधिशांच्या दालनात सोडले जात नव्हते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!