सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि. : रुग्णवाहिकांचे भाडेदर निश्चित करुन ते परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करावेत असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेमध्ये परिवहन विभागाला दिले होते. त्यानुसार सातारा परिवहन कार्यालयाकडून रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदराचा ठराव अटी व शर्तीसह मंजूर केला आहे.

यामध्ये रुग्णवाहिकेच्या प्रकार व अंतरानुसार भाडेदर निश्चित करण्यात आला आहे.

●मारुती व्हॅन : 20 कि.मी. अथवा दोन तासाकरिता 350 रुपये. तर प्रति कि.मी. 12 रुपये भाडे आकारणी करण्यात येणार आहे. तर 24 तासांसाठी 1200 रुपये निश्चित करण्यात आले आहे.

●टाटा सुमो आणि मॅटेडोर सदृश्य वहाने : 20 कि.मी. अथवा दोन तासाकरिता 450 रुपये. तर प्रति कि.मी. 13 रुपये भाडे आकारणी करण्यात येणार आहे. तर 24 तासांसाठी 1500 रुपये निश्चित करण्यात आले आहे.

●टाटा 407, स्वराज माझा सदृष्य वहाने : 20 कि.मी. अथवा दोन तासाकरिता 550 रुपये. तर प्रति कि.मी. 14 रुपये भाडे आकारणी करण्यात येणार आहे. तर 24 तासांसाठी 2000 रुपये निश्चित करण्यात आले आहे.

● वातानुकूलित वहाने : 20 कि.मी. अथवा दोन तासाकरिता 700 रुपये. तर प्रति कि.मी. 20 रुपये भाडे आकारणी करण्यात येणार आहे. तर 24 तासांसाठी 3000 रुपये निश्चित करण्यात आले आहे.

रुग्णवहिकेला दरपत्रकात दर्शविलेल्या भाडे दरापेक्षा कमी अथवा मोफत सेवा देता येऊ शकेल, परंतु निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारता येणार नाही. तसेच हे भाडे दरपत्रक सर्व रुगणवाहिकेच्या आतील बाजूस लावणे चालक व मालक यांना बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच 20 कि.मी. पेक्षा जास्त अंतर गेल्यास, प्रति कि मी. भाडे मूळ भाडेदरामध्ये वाढ करुन भाडे घेता येणार आहे. त्याचसोबत परतीचे अंतर सुध्दा विचारात घेऊन भाडे आकारावे, असे ही आवाहन परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!