दैनिक स्थैर्य | दि. 14 जुलै 2024 | फलटण | आता होणाऱ्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आंबेडकरी चळवळीतील सर्वसामान्य कार्यकर्ता हाच आता आमदार म्हणून निवडून जाणार आहे; असा ठराव फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे.
नुकतेच फलटण येथील मंगळवार पेठ येथे असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात आयोजित बैठकीत सदरील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदरील ठराव करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आंबेडकरी चळवळीतील उमेदवार आता आमदार होणे गरजेचे आहे. सन 2009 साली मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. तेंव्हापासून फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा राखीव करण्यात आला आहे. सन 2009 सालापासून आज अखेर आंबेडकरी चळवळीतील सर्वसामान्य कार्यकर्ता हा आमदार झाला नाही. आता ह्या वेळी जर आमदार झाला नाही तर पुन्हा आमदार होणे शक्य होणार नाही; असे मत व्यक्त केले जात आहे.
यावेळी सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.