स्थैर्य, मुंबई, दि. २७: 71.2 बिलियन डॉलर्सच्या मालमत्तेचे मालक मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अंबानी यांना भारत सरकारकडून z + सुरक्षा मिळाली आहे. रिपोर्ट्सनुसार मुकेश यांचे सुरक्षारक्षक असलेले पोलिस बुलेटप्रुफ बीएमडब्ल्यू, रेंजरोव्हर सारख्या वाहनांमधून येत असतात. रिपोर्ट्सनुसार मुकेश यांच्या ताफ्यात पांढर्या मर्सिडीजची AMG G63 मॉडेल कारचा समावेश असतो. मुकेश अंबानी हे देशातील एकमेव उद्योगपती आहेत ज्यांना ‘Z’ प्लस सुरक्षा मिळाली आहे.
सुरक्षेसाठी 20 लाख रुपये खर्च
अंबानी आपल्या सुरक्षेचा संपूर्ण खर्च स्वतः उचलतात. रिपोर्ट्सनुसार मुकेश अंबानी त्यांच्या सुरक्षेसाठी दरमहा सुमारे 20 लाख रुपये खर्च करतात.
55 सुरक्षारक्षक नेहमी मुकेश अंबानी यांचे रक्षण करतात
Z+ सुरक्षा असल्याने मुकेश अंबानीच्या सुरक्षे वेळी एकाच वेळी 55 सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. यामध्ये 10 एनएसजी आणि एसपीजी कमांडो आहेत आणि बाकीचे पोलिस पथकातील आहेत. पहिल्या फेरीच्या सुरक्षेसाठी जबाबदारी एनएसजीची असते तर दुसऱ्या लेअरमध्ये एसपीजीचे लोक असतात. याशिवाय आयटीबीपी आणि सीआरपीएफचे जवानही सुरक्षेत तैनात आहेत. एसपीजी कमांडो सहसा झेड प्लस प्रकारातील संरक्षणाखाली पंतप्रधान आणि माजी पंतप्रधानांना सुरक्षा कवच पुरवतात.
अंबानी या गाड्यांनी करतात प्रवास
मुकेश अंबानी यांच्याकडे दोन बुलेटप्रूफ कारही आहेत. यामध्ये आर्मर्ड BMW 760Li आणि दुसरी मर्सिडीज बेंझ S660 गार्डचा समावेश आहे. साधारणत: मुकेश अंबानी या कारमध्येच दिसले आहेत.
ताफ्यातील दोन बाईकही खूप खास
अंबानीच्या सुरक्षिततेत सर्वात पुढे चालणाऱ्या दोन बाईक्ससुद्धा खूप खास आहेत. रॉयल एनफील्डच्या इलेक्ट्राला रोड रेज कस्टम बिल्ड्सने कस्टमाइज करुन खास मुकेश अंबानी यांच्या ताफ्यासाठी तयार केली आहे. या बाईक्स सहसा मुंबई पोलिस असतात.
नीता अंबानी यांना मिळाली आहे ‘Y’ श्रेणीची सुरक्षा
केवळ मुकेश अंबानीच नाही तर सरकारने त्यांची पत्नी नीता अंबानी यांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षाही दिली आहे. नीता यांच्या सुरक्षेत 10 सशस्त्र सीआरपीएफ कमांडो तैनात आहेत. नीता अंबानी घराबाहेर देशभरात जिथेही जातात, तिथे हे सुरक्षारक्षक त्यांची सुरक्षा करतात.
मुकेश यांना ‘Z’प्लस देण्याचे प्रकरण सुप्रीम कोर्टातही गेले होते
मुंबईच्या अंधेरी भागातील रहिवासी चार्टर्ड अकाउंटंट (सीएम) हिमांशू अग्रवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून मुकेश अंबानी यांना ‘Z’ प्लस सुरक्षा देण्याबाबत विचारणा केली. यामध्ये असा दावा केला जात आहे की, अंबानींच्या सुरक्षिततेमुळे सरकारी तिजोरीवर अधिक भार पडेल. मुकेश अंबानी किंवा त्यांच्या कुटुंबाला कोणताही धोका नसल्याचेही याचिकेत म्हटले आहे. मात्र, याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुकेश अंबानी याच्या वकिलांकडून सांगण्यात आले की, हा खर्च पूर्णतः अंबानींनी उचलला आहे, ज्यानंतर नोव्हेंबर 2020 मध्ये ही याचिका रद्द करण्यात आली होती.